India-US Trade Deal : अमेरिकन परराष्ट्र विभागाचे अधिकारी भारत दौऱ्यावर, कोणत्या विषयांवर चर्चा होणार याकडे जगाचे लक्ष

दौऱ्यात अ‍ॅलिसन हूकर बेंगळुरूमधील इस्रो केंद्राला भेट देतील, तसेच अवकाश, ऊर्जा व तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीय तज्ज्ञांशी संवाद साधतील.

India-US Trade Deal : अमेरिकन परराष्ट्र विभागाचे अधिकारी भारत दौऱ्यावर, कोणत्या विषयांवर चर्चा होणार याकडे जगाचे लक्ष

India-US Trade Deal : भारत-अमेरिका व्यापार चर्चांना नवी गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. अमेरिकन परराष्ट्र विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि उप-परराष्ट्र सचिव (राजकीय व्यवहार) अ‍ॅलिसन हूकर या रविवारपासून गुरुवारपर्यंत भारत दौऱ्यावर असून, दोन्ही देशांमधील व्यापार आणि सामरिक सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहेत. ही माहिती भारतातील अमेरिकन दूतावासाने दिली आहे. दूतावासाच्या निवेदनानुसार, हूकर यांचा दौरा हा ‘मुक्त आणि खुले इंडो-पॅसिफिक क्षेत्र’ या उद्दिष्टाला गती देण्यासाठी तसेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्राधान्यक्रमाशी सुसंगत असा पाऊल मानला जात आहे.

हेही वाचा – Indians Deported From US: अमेरिकेत भारतीयांवर कारवाई! सरकारकडून डंकी रूट बंद; 2025 मध्ये अमेरिकेतून 3155 भारतीय हद्दपार

इस्रो भेट आणि उच्चस्तरीय चर्चा

दौऱ्यात अ‍ॅलिसन हूकर बेंगळुरूमधील इस्रो केंद्राला भेट देतील, तसेच अवकाश, ऊर्जा व तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीय तज्ज्ञांशी संवाद साधतील. भारत-अमेरिका संशोधन भागीदारीतील नवोपक्रम, एआय क्षेत्रातील संभाव्यता आणि भविष्यातील संयुक्त प्रकल्प या मुद्द्यांवर विशेष भर असेल. हूकर या नवी दिल्लीमध्ये परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्यासह वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्यांशी देखील चर्चा करतील. या बैठकीत आर्थिक सहकार्य बळकट करणे, व्यापार अडथळे दूर करणे, अमेरिकेच्या निर्यातीला चालना देणे यांवर भर देण्यात येणार आहे.

अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधींचीही भारत भेट

याचदरम्यान ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, अमेरिकेचे उप व्यापार प्रतिनिधी रिक स्वित्झर आणि त्यांची टीमही या आठवड्यात भारतात येत आहे. दोन्ही बाजूंमध्ये व्यापार करारासाठीच्या वाटाघाटींना वेग देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

हेही वाचा – France Car Accident: फ्रान्समधील ख्रिसमस मार्केटमध्ये अनियंत्रित कारची अनेकांना धडक; 10 जणांचा मृत्यू

पुतिन यांच्या भारत दौऱ्यानंतर महत्त्वाची हालचाल

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या अलीकडील दोन दिवसांच्या भारत दौऱ्यानंतर अमेरिकन अधिकाऱ्यांच्या भेटींना विशेष राजनैतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. भारत सरकारला अमेरिकेबरोबर असा व्यापार करार करण्याची इच्छा आहे, ज्यामुळे रशियन तेल खरेदीवर अमेरिकेने लादलेले 50 टक्के शुल्क कमी होऊ शकते. या सलग उच्चस्तरीय भेटींमुळे भारत-अमेरिका संबंधात नवा अध्याय सुरू होण्याची चिन्हे दिसत असून, व्यापार, तंत्रज्ञान आणि अवकाश सहकार्याला मोठी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number