‘राजा शिवाजी’ चित्रपटाने अवघ्या 2 दिवसात बॉक्स ऑफिस गाजवला

बॉलिवूड तसेच मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता रितेश देशमुख याचा 'राजा शिवाजी' हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच जोरदार चर्चेत आला होता. हा चित्रपट 1 मे 2026 रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनी प्रदर्शित झाला आहे.

Raja Shivaji Film Collection : ''राजा शिवाजी'' चित्रपटाचा धुमाकूळ! अवघ्या दोन दिवसात चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवला

1 / 7

बॉलिवूड तसेच मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता रितेश देशमुख याचा ''राजा शिवाजी'' हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच जोरदार चर्चेत आला होता. हा चित्रपट 1 मे 2026 रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनी प्रदर्शित झाला आहे.

2 / 7

या चित्रपटात रितेश देशमुखने स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहायला मिळाला आहे. त्याचसोबत जेनेलिया सईबाईंच्या भूमिकेत आहे. तसेच संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, फरदीन खान, अमोल गुप्ते, जितेंद्र जोशी, विद्या बालन, भाग्यश्री, सिद्धार्थ जाधव, सलमान खान यांच्याही भूमिका आहेत.

3 / 7

धुरंधर 2, भूत बंगलानंतर आता ''राजा शिवाजी'' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या दिवसाची कमाई पाहता ''राजा शिवाजी'' या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत सर्वात मोठ्या ओपनिंगचा विक्रम करून इतिहास रचला आहे.

4 / 7

पहिल्या दिवशी 11.35 कोटी, 10.55 कोटी रुपये कमवत चित्रपटाने दिवशीही दुहेरी आकड्यांवरील टप्पा कायम ठेवला आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित आणि जेनेलिया डिसूझा, ज्योती देशपांडे निर्मित या चित्रपटाने फक्त दोन दिवसांत फिल्मने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 20 कोटींचा टप्पा ओलांडला.

5 / 7

हा चित्रपट मराठी आणि हिंदीमध्ये प्रदर्शित झाला आहे. तसेच हिंदी व्हर्जनने 3.35 कोटी रुपयांची कमाई केली.

6 / 7

या चित्रपटाची खूप प्रशंसा होत असून बॉक्स ऑफिसवरही हा चांगली कमाई करताना पाहायला मिळतो आहे. ''राजा शिवाजी'' हा चित्रपट भूत बंगला आणि धुरंधर-2 नंतर या वर्षातील तिसरा बिग ओपनर चित्रपट ठरला आहे.

7 / 7
Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number