गेल्या काही वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते आणि घरच्यांच्या संमतीने लग्न करण्याचेही ठरवले होते. नात्यात असताना अनेक सुखी संसाराची स्वप्न पाहिली. तरुणाने मुंबईहून गावी येत आपल्या आवडच्या तरुणीसोबत लग्न ही केलं. सर्व काही आनंदाने झालं.मात्र, लग्नानंतर नवीन दाम्पत्य झोपण्यासाठी गेले असता असं काही होईल, ज्याची कल्पना कोणीही केली नव्हती. लग्नाच्या एका दिवसांतच लग्न घर शोकांतिकेत बदल आणि काही तासांमध्येच एका चितेवर दोघांचे मृतदेह ठेवण्यात आले होते. नेमकं काय घडलं, जाणून घेऊया.
घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्दैवी घटना उत्तर प्रदेशातील सिद्धार्थ नगर जिल्ह्यातील असून अवघ्या 24 तासांच नवदाम्पत्याच्या मृत्यू झाला आहे. मृत नवरेदव देशराज आणि नवरी अनिता या दोघांमध्ये गेल्या काही काळापासून प्रेमसंबंध होते. देशराज हा जनियाजोत गावचा होता तर अनिता ही जोगिया परिसरातील रहिवासी होती.
प्रेमसंबंधाचं नातं हे लग्नात बदलण्यासाठी दोघांनी घरच्यांची संमती घेतली आणि लग्नाचे ठरवले होते. देशराज हा मुंबईहून गावी परत आल्यानंतर अनित त्यांच्या घरी आली होती. त्यानंतर सोमवारी दोन्ही कुटुंबाच्या संमतीने बांसी येथील एका मंदिरात यांचे लग्न ही झाले. मात्र, लग्नानंतर अवघ्या एका दिवसात दोघांचे मृतदेह ज्या अवस्थेत आढळे त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कधी समोर आली घटना?
लग्न पार पडताच घरातील सर्वांचे जेवण ही झाले. त्यानंतर देशराज, अनिता आणि नातेवाईक छतावर झोपण्यासाठी गेले होते. मंगळवारी साधारण सकाळी देशराजची मावशी मीनाक्षी या दोघांना उठवण्यासाठी त्यांच्या खोलीजवळ गेली. आजाव दिल्यानंतरही, खोलीतून दोघांनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर दरवाजा हलूच ढकलला असता तो उघडला गेला. खोलीत अनिता ही बेडवर मृतावस्थेत, तर देशराज फासावर लटकलेला आढळून आला.या दृश्यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
नवरीच्या बहिणीची माहिती आली समोर
मृत अनिताच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार, मीनाक्षी मावशी त्यांना खोलीतून उठवण्यासाठी गेली असता, त्यांच्या खोलीच्या दरवाजाला आतून कडी नव्हती. महत्त्वाचे म्हणजे, यांच्या लग्नासाठी दोन्ही घरातल्याची संमती होती आणि कोणताही वाद नव्हता असेही तिने सांगितले. देशराजला लग्नाच्या टायफॉइड झाला होता.मात्र, त्याने त्यावर उपचार घेण्यास नकार दिल्याचीही माहिती समोर येत आहे. या आजाराचा दोघांच्या मृत्यूशी काही संबंध होता का, हे अजून स्पष्ट झाले नाही.
घटना समोर येताच पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल होताच तेथील पाहणी केली आणि दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले गेले आहेत. सध्या कुटुंबीयांची चौकशी करण्यात येत असून,मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नाही. शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतरच पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.