‘मे’ च्या उकाड्याने हैराण झालात? कोकणातील ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या

उन्हाळ्याच्या सुट्टीत थंड आणि आल्हाददायक वातावरणाचा सहवास प्रत्येकाला घ्यावासा वाटतो, यासाठी कोकणात दडलेल्या 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या

Konkan Hill Station for Summer : ''मे'' च्या उकाड्याने हैराण झालात? थंडाव्यासाठी आपल्या कोकणात दडलेल्या ''या'' ठिकाणांना नक्की भेट द्या

1 / 8

उन्हाळ्याच्या सुट्टीत थंड आणि आल्हाददायक वातावरणाचा सहवास प्रत्येकाला घ्यावासा वाटतो, यासाठी कोकणात दडलेल्या ''या'' ठिकाणांना नक्की भेट द्या

2 / 8

कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा येथे अवचितगड किल्ला आणि नयनरम्य कुंडलिका नदी आहे. निसर्गभ्रमण आणि कॅम्पिंग व्यतिरिक्त, ट्रेकिंग आणि आनंददायी सहलींसाठी देखील एक उत्तम ठिकाण आहे.

3 / 8

माणगाव तेथील देवकुंड धबधबा हा कोलाडमधील निर्मळ कुंडलिका नदीच्या खडकाळ तळात खोलवर कोसळतो. स्वच्छ पाणी, आजूबाजूला डोंगर आणि जंगल असलेले डोळ्यांना तृप्त करणारे दृश्य येथे आहेत.

4 / 8

रत्नागिरी जिल्ह्यातील माचाळ हे निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे. हे ठिकाण उन्हाळ्यातही थंड आणि हिरवागार असतो. थंडगार हवा शांत ठिकाणांपैकी एक आहे.

5 / 8

रायगड जिल्हा कोलाड तालुक्यातील ताम्हिणी घाट भव्य सह्याद्री पर्वतरांगा, धबधबे, घनदाट जंगले, नद्या आणि हिरवीगार कुरणे यांनी नटलेली आहे. ताम्हिणी आणि मुळशी यांच्यामध्ये असलेला एक छोटा पर्वतीय मार्ग आहे.

6 / 8

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे धुक्याने वेढलेले थंड हवेचे ठिकाण मे महिन्यातही येथे हवा थंड असते आणि धुक्याची चादर पाहायला मिळते.

7 / 8

कोकणचे महाबळेश्वर म्हणून ओळखले जाणारे दापोली येथे उपलब्ध असलेल्या मुरुड बीच, हर्णे बंदर आणि कड्यावरचा गणपती या ठिकाणांचा आनंद घेत, तुम्ही या ठिकाणांच्या सौंदर्यात रमून जाऊ शकता. इथले हवामान इतर किनारपट्टीच्या तुलनेत खूप सुखद असते.

8 / 8
Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number