फुलांचा वर्षाव करत आशाताईंना हृदयस्पर्शी निरोप

दैवी सुरांनी संपूर्ण अशा संपूर्ण देशाचा गाण सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचे 92 व्या वर्षी निधन झाले. 11 एप्रिल रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर त्यांनी 12 एप्रिल रोजी जगाचा निरोप घेतला.

Asha Bhosle Funeral : पांढऱ्या-पिवळ्या फुलांची सजावट, आजूबाजूला गर्दीचा लोट अन् चाहत्यांकडून फुलांचा वर्षाव करत आशाताईंना हृदयस्पर्शी निरोप

1 / 7

दैवी सुरांनी संपूर्ण अशा संपूर्ण देशाचा गाण सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचे 92 व्या वर्षी निधन झाले. 11 एप्रिल रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर त्यांनी 12 एप्रिल रोजी जगाचा निरोप घेतला.

2 / 7

आज 13 एप्रिल रोजी त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशान भूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात 4 वाजता अंत्यसंस्कार पार पडतील. दरम्यान त्यांच्या अंतयात्रेला सुरुवात झाली आहे.

3 / 7

यावेळी आशा भोसले यांच्या अंतयात्रेसाठी पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाच्या सुगंधी फुलांनी गाडीला सजवण्यात आले आहे. मुंबई महानगर पालिकेकडून अंत्यविधीच्या ठिकाणी 500 पेक्षा अधिक अतिमहत्वाचे लोकांच्या आसनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

4 / 7

यावेळी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाखो करोडो अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्यांच्या अंतयात्रेवेळी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला . स्मशान भूमीत अनेक मंत्री आणि नेते अंत्यविधीला उपस्थित राहणार आहेत.

5 / 7

तसेच शिवाजी पार्क येथील भागोजी किर स्मशानभूमीच्या आजूबाजूला LED स्क्रीनची व्यवस्थाही करण्यात आली आहे. तेथे LED स्क्रीन आणि साउंडवर आशाताईंचे गाणी लावून आठवणींना उजाळा दिला जाणार आहे.

6 / 7

यावेळी त्यांच्यावर अत्यंविधी पार पाडण्यासाठी स्मशान भूमीत अनेक मंत्री आणि नेते उपस्थित राहणार आहेत.

7 / 7
Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number