Gas Tanker Explosion : गॅस टँकर उलटल्याने भीषण स्फोट; 4 जणांचा मृत्यू, पाहा थरकाप उडवणारा व्हिडीओ

टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या दुर्घटनेत 17 जण जखमी झाले असून मृतांमध्ये टँकर चालकाचाही समावेश आहे.

Gas Tanker Explosion : गॅस टँकर उलटल्याने भीषण स्फोट; 4 जणांचा मृत्यू, पाहा थरकाप उडवणारा व्हिडीओ

Gas Tanker Explosion : चिलीची राजधानी सॅंटियागोमध्ये द्रव वायू (Liquid Gas) वाहून नेणारा ट्रक उलटून झालेल्या भीषण स्फोटात किमान 4 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या दुर्घटनेत 17 जण जखमी झाले असून मृतांमध्ये टँकर चालकाचाही समावेश आहे. हा ट्रक स्थानिक गॅस कंपनी ‘गॅस्को’चा होता. सॅंटियागोच्या उत्तरेकडील उपनगर रेन्का येथील एका प्रमुख महामार्ग आणि औद्योगिक क्षेत्राजवळ ही घटना घडली असून, या भीषण अपघाताचा तपास सध्या सुरू आहे.

टँकर उलटला, पांढरा धूर पसरला आणि मोठा स्फोट झाला
ही भयानक घटना 19 फेब्रूवारी 2026 रोजी घडली, जेव्हा गॅसने भरलेला टँकर एका ओव्हरपासच्या आधारस्तंभाजवळ उलटला. टँकर उलटताच अत्यंत थंड द्रव वायू उच्च दाबाने बाहेर पडू लागला, ज्यामुळे परिसरात वेगाने पांढरा ढग (गॅस क्लाउड) पसरला. त्यानंतर काही क्षणांतच एक मोठा स्फोट झाला आणि टँकरने पेट घेतला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, हा स्फोट इतका शक्तिशाली होता की 150 ते 200 मीटरच्या परिघात तीव्र कंपने जाणवली आणि रस्त्यावरील वाहनांना आगीच्या ज्वाळांनी वेढले.

हेही वाचा – Viral Video Of Baby Monkey: आईसह प्राणीसंग्रहालयात सर्वांनी नाकारलं, पण एका खेळण्याने दिला आधार; ‘पंच’ माकडाचा व्हिडीओ पाहून नेटीझन्स भावूक

प्रचंड नुकसान आणि जखमींची प्रकृती चिंताजनक
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटामुळे सुमारे 50 वाहनांचे नुकसान झाले आहे. सॅंटियागो मेट्रोपॉलिटन रीजनचे गव्हर्नर क्लॉडिओ ओरेगो यांनी माहिती दिली की, जखमींपैकी 5 जणांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. यामध्ये एका व्यक्तीचे शरीर पूर्णपणे भाजले असून त्याची झुंज मृत्यूशी सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number