IPL 2026 Captains List: IPL साठी सर्व 10 संघांच्या कर्णधारांची नावे जाहीर; राजस्थानची धुरा ‘या’ युवा खेळाडूच्या खांद्यावर, पाहा संपूर्ण यादी

सलामीचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात रंगणार आहे. या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेसाठी सर्व 10 संघांनी आपल्या कर्णधारांच्या नावांची अधिकृत घोषणा केली आहे.

IPL 2026 Captains List: IPL साठी सर्व 10 संघांच्या कर्णधारांची नावे जाहीर; राजस्थानची धुरा ‘या’ युवा खेळाडूच्या खांद्यावर, पाहा संपूर्ण यादी

IPL 2026 Captains List: आयपीएल (IPL) च्या 19 व्या हंगामाचा बिगुल वाजला असून ही स्पर्धा 28 मार्चपासून सुरू होणार आहे. सलामीचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात रंगणार आहे. या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेसाठी सर्व 10 संघांनी आपल्या कर्णधारांच्या नावांची अधिकृत घोषणा केली आहे. काही संघांनी आपल्या जुन्याच अनुभवी नेतृत्वावर विश्वास दर्शवला आहे, तर काही संघांनी नव्या दमाच्या खेळाडूंकडे मैदानातील धुरा सोपवली आहे.

यशस्वी संघांचे नेतृत्व अनुभवी खेळाडूंकडे
आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्स (MI) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांनी आपापले कर्णधार कायम ठेवले आहेत. मुंबई इंडियन्सचे नेतृत्व सलग तिसऱ्या वर्षी हार्दिक पांड्या करणार आहे. तर, चेन्नई सुपर किंग्सची धुरा पुन्हा एकदा ऋतुराज गायकवाड सांभाळताना दिसेल. विशेष म्हणजे, कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) अजिंक्य रहाणे यालाच आपला कर्णधार म्हणून कायम ठेवले आहे. रहाणेच्या मार्गदर्शनाखाली कोलकाता संघ यावर्षी चौथे विजेतेपद पटकावण्यासाठी मैदानात उतरेल.

राजस्थान आणि बंगळुरूच्या नेतृत्वात मोठे बदल
या हंगामातील सर्वात मोठी बातमी म्हणजे राजस्थान रॉयल्सने (RR) युवा अष्टपैलू रियान पराग याच्याकडे संघाचे कर्णधारपद सोपवले आहे. संजू सॅमसनच्या अनुपस्थितीत परागने दाखवलेल्या नेतृत्वाच्या अनुभवामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे, गेल्या वर्षी आरसीबीला पहिले विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा रजत पाटीदार या हंगामात संघाचे नेतृत्व करणार आहे. तसेच, सनरायझर्स हैदराबादची धुरा पॅट कमिन्सकडे, तर गुजरात टायटन्सची जबाबदारी शुभमन गिलकडे कायम आहे.

हेही वाचा – Devisha Shetty Baby Shower: T20 विश्वचषक विजयानंतर सूर्यकुमार यादवच्या घरी हलणार पाळणा; देविशा शेट्टीच्या डोहाळे जेवणाचा व्हिडीओ व्हायरल

संघ आणि कर्णधार
मुंबई इंडियन्स, हार्दिक पांड्या
चेन्नई सुपर किंग्स, ऋतुराज गायकवाड
कोलकाता नाईट रायडर्स, अजिंक्य रहाणे
सनरायझर्स हैदराबाद, पॅट कमिन्स
राजस्थान रॉयल्स, रियान पराग
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, रजत पाटीदार
लखनौ सुपर जायंट्स, ऋषभ पंत
पंजाब किंग्स, श्रेयस अय्यर
दिल्ली कॅपिटल्स,अक्षर पटेल
गुजरात टायटन्स, शुभमन गिल

विजेतेपदाच्या प्रतीक्षेत असलेले संघ
पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांना अजूनही आपल्या पहिल्या विजेतेपदाची प्रतीक्षा आहे. पंजाब किंग्स पुन्हा एकदा श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळेल, ज्याने गेल्या हंगामात संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवले होते. दिल्ली कॅपिटल्सने अक्षर पटेलवर आपला विश्वास कायम ठेवला आहे, तर लखनौ सुपर जायंट्सचे (LSG) नेतृत्व ऋषभ पंत करणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number