Lionel Messi: वानखेडे स्टेडियमवर ऐतिहासिक क्षण! सचिन तेंडुलकर आणि लिओनेल मेस्सी यांची भेट; ‘या’ खास वस्तूंची केली देवाणघेवाण

वानखेडे स्टेडियमवर आयोजित एका विशेष कार्यक्रमात मेस्सीने बॉलिवूडमधील अनेक नामवंत व्यक्तींसह क्रीडाक्षेत्रातील दिग्गजांची भेट घेतली. याच वेळी त्याची भेट सचिन तेंडुलकर यांच्याशी झाली.

Lionel Messi: वानखेडे स्टेडियमवर ऐतिहासिक क्षण! सचिन तेंडुलकर आणि लिओनेल मेस्सी यांची भेट; ‘या’ खास वस्तूंची केली देवाणघेवाण

Lionel Messi: जगातील फुटबॉलप्रेमींचे लक्ष वेधून घेणारा क्षण मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पाहायला मिळाला. अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आणि क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाणारे सचिन तेंडुलकर अखेर समोरासमोर आले. मेस्सी सध्या भारत दौऱ्यावर असून दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात तो मुंबईत दाखल झाला होता. वानखेडे स्टेडियमवर आयोजित एका विशेष कार्यक्रमात मेस्सीने बॉलिवूडमधील अनेक नामवंत व्यक्तींसह क्रीडाक्षेत्रातील दिग्गजांची भेट घेतली. याच वेळी त्याची भेट सचिन तेंडुलकर यांच्याशी झाली. हा क्षण पाहण्यासाठी स्टेडियममध्ये चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती. अनेकांसाठी हा क्षण स्वप्नपूर्ती ठरला.

या भेटीदरम्यान सचिन तेंडुलकर यांनी मेस्सीला टीम इंडियाची जर्सी भेट दिली, ज्यावर सचिनची स्वाक्षरी होती. त्यानंतर दोघांनी एकत्र फोटोसाठी पोज दिली. याला उत्तर म्हणून मेस्सीने सचिन तेंडुलकरला एक फुटबॉल भेट दिला, ज्यामुळे हा क्षण अधिकच खास ठरला. कार्यक्रमादरम्यान मेस्सीने भारताचा स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्री यांचीही भेट घेतली.  

मेस्सीच्या भारत दौऱ्याची सुरुवात कोलकात्यापासून झाली होती. तेथे त्याच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले. मात्र सॉल्ट लेक स्टेडियममध्ये झालेल्या गोंधळामुळे कार्यक्रम वादात सापडला आणि या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर हैदराबादमधील कार्यक्रम यशस्वी पार पडला. आता दौऱ्याच्या पुढील टप्प्यात मेस्सी दिल्लीला जाणार असल्याची माहिती आहे. सचिन आणि मेस्सी यांची ही भेट भारतीय क्रीडाप्रेमींसाठी कायम लक्षात राहणारा क्षण ठरली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number