WhatsApp Web : व्हॉट्सॲप वेबमध्ये स्क्रोलिंग फीचर वापरताना समस्या; अनेकांनी सांगितली अडचण

अनेक वापरकर्त्यांना व्हॉट्सॲप वेब वापरताना अडचणी येत असल्याचे समोर आले आहे. वापरकर्त्यांच्या मते व्हॉट्सॲप वेबमध्ये चॅट स्क्रोल होत नसल्याने चॅटमधील जुने मेसेज पाहणे त्यांना कठीण जात आहे.

WhatsApp Web : व्हॉट्सॲप वेबमध्ये स्क्रोलिंग फीचर वापरताना समस्या; अनेकांनी सांगितली अडचण

whatsapp web scrolling problem : सध्या अनेक कामं, नोंदी, मेसेजिंग व्हॉटसअॅपवरून केलं जातं. जगभरात सोशल मेसेजींग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप मोठ्या प्रमाणात वापरला जातो. त्यामुळे तो रोजच्या जीवनाचा आणि कामांचा भाग बनला आहे. अशात यात काही अडचण निर्माण झाली असल्यामुळे वापरकर्त्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. अनेक वापरकर्त्यांना व्हॉट्सॲप वेब वापरताना अडचण येत आहे. व्हॉट्सॲप वेबवर पूर्वीचे मेसेज पाहण्यासाठी स्क्रोलिंग केले असता मेसेज दिसत नसल्याची तक्रार वापरकर्ते करत आहेत.

हेही वाचा – Fake IPhone Detection: सेकंड हँड आयफोन घेताय? बनावट फोन ओळखण्यासाठी 'या' ट्रिक्स वापरा

सोशल मीडियावरील अनेक वापरकर्त्यांनी यासंबंधी तक्रारी नोंदवल्या आहेत. व्हॉट्सॲप वेबचा वापर करताना चॅट स्क्रोल होत नसल्यामुळे चॅटमधील जुने मेसेज पाहणे वापरकर्त्यांना कठीण जात आहे. यामुळे वापरकर्ते त्रस्त झाले आहेत. अनेक वापरकर्त्यांनी या अडचणीबद्दल एक्सवर पोस्ट केल्या आहेत. व्हॉट्सॲप वेबमध्ये काही बिघाड झाला आहे का? सर्वांनाच ही अडचण जाणवत आहे का? मी वर किंवा खाली स्क्रोल करू शकत नाहीये, अशा पोस्ट लोक करत आहेत. गेल्या काही तासामध्ये अशा पोस्ट मोठ्या प्रमाणावर येत आहेत. अनेक वापरकर्ते त्यांना देखील अशीच अडचण येत असल्याचे सांगत आहेत.

आणखी एका वापरकर्त्याने म्हटले की, 'आज कोणाला व्हॉट्सअॅप स्क्रोलिंग करताना अडचण येत आहे का? कारण ऑफिसमधील 3 ते 4 जणांना आज व्हॉट्सअॅप वेब वापरताना नेहमीपेक्षा काहीसा विचित्र अनुभव आला, जर तुम्हाला देखील असाच अनुभव आला असेल तर मला सांगा..', असे वापरकर्ते इतरांनाही विचारत आहेत.

हेही वाचा – आता Whatsappवरून काही मिनिटांत डाउनलोड करता येते Aadhaar Card; जाणून घ्या, सोपी पद्धत

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number