Plane Crash: मोठी बातमी! आणखी एका विमानाचा अपघात; 30 फूट उंचीवर असताना झाडाला धडकलं अन्…

खुरासागरहा गावाजवळच्या दाट जंगलात ही दुर्घटना घडली असून, विमान एका झाडाला धडकल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

Plane Crash: मोठी बातमी! आणखी एका विमानाचा अपघात; 30 फूट उंचीवर असताना झाडाला धडकलं अन्…

Chhattisgarh Plane Crash:  छत्तीसगडमधील जशपूर जिल्ह्यातून विमान अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील नारायणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रतनपहाली वनक्षेत्रात एक खाजगी विमान कोसळले आहे. खुरासागरहा गावाजवळच्या दाट जंगलात ही दुर्घटना घडली असून, विमान एका झाडाला धडकल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहे.

30 फूट उंचीवर असताना अपघात; विमानाचे झाले तुकडे
मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान जमिनीपासून अवघ्या 30 फूट उंचीवर उडत असताना झाडाला धडकले. हे एक चार्टर्ड विमान असल्याचे सांगितले जात असून, 'आरा' टेकड्यांवरून (Ara Hills) जात असताना विमानाची धडक पर्वताच्या शिखरांना बसली आणि त्यानंतर विमान जंगलात कोसळले. या भीषण धडकेत विमानाचे अक्षरश: तुकडे झाले आहेत. सोशल मीडियावर या अपघाताचे काही व्हिडिओ व्हायरल होत असून, त्यामध्ये विमानाचे अवशेष विखुरलेले पाहायला मिळत आहेत.

पोलीस अधीक्षक आणि मदत पथके घटनास्थळी दाखल
जशपूरचे पोलीस अधीक्षक (SP) यांनी या विमान अपघाताच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन एसएसपी (SSP) लाल उमेद सिंग यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि प्रशासकीय पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. "मी स्वतः घटनास्थळाकडे जात असून, सविस्तर माहिती मिळाल्यानंतरच अधिक तपशील देता येईल," असे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा – Fly91 Airlines: लँडिंग फेल, 4 तास विमानाच्या हवेतच घिरट्या, प्रवाशांच्या किंकाळ्या आणि आक्रोश; Fly91 विमानाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर

प्रवाशांच्या संख्येबाबत अद्याप अस्पष्टता
विमानामध्ये एकूण किती प्रवासी आणि कर्मचारी होते, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. घनदाट जंगल आणि पर्वतीय भाग असल्यामुळे मदत कार्यात काही प्रमाणात अडथळे येत आहेत, तरीही प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोधमोहीम राबवली जात आहे. विमानात नेमके किती लोक होते आणि त्यांची सद्यस्थिती काय आहे, हे मदत पथक विमानापर्यंत पोहोचल्यानंतरच स्पष्ट होईल.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number