Kashinath Ghanekar Natyagruha : ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह 6 महिने राहणार बंद; मोठा कायापालट होणार

आगामी 6 महिन्यांची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर नव्या वर्षात हे नाट्यगृह एका नव्या आणि अधिक समृद्ध रूपात पुन्हा नाट्यरसिकांच्या सेवेत खुले होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Kashinath Ghanekar Natyagruha : ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह 6 महिने राहणार बंद; मोठा कायापालट होणार

Kashinath Ghanekar Natyagruha Renovation: ठाण्यातील मानपाडा हिरानंदानी मेडोज परिसरात असलेल्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाचे नूतनीकरण हाती घेण्यात आल्यामुळे येत्या 6 महिन्यांसाठी नाट्यगृह नाटकांच्या प्रयोगांसाठी बंद राहणार आहे. गेल्या काही वर्षांपासून राज्यातील अनेक नाट्यगृहांच्या दुरावस्थेचा प्रश्न चर्चेत असून दुरुस्तीसाठी 6 महिने ते 1 वर्षाचा कालावधी लागत आहे. आता घाणेकर नाट्यगृहातही दुरुस्तीची कामे सुरू होत असल्याने नाट्यनिर्माते, कलाकार आणि नाट्यरसिकांचा मोठा हिरमोड झाला आहे. राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या 5 कोटी रुपयांच्या विशेष निधीतून ही सर्व डागडुजी केली जाणार आहे.

छत गळती आणि सुरक्षेच्या कारणास्तव नूतनीकरणाचा निर्णय
ठाणे महापालिकेने यापूर्वी ऑक्टोबर 2024 मध्ये मध्यवर्ती भागातील राम गणेश गडकरी रंगायतनच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले होते, ज्याचे लोकार्पण 15 ऑगस्ट रोजी पार पडले. गडकरी रंगायतन सुरू झाल्यानंतर आता घाणेकर नाट्यगृहाच्या दुरुस्तीच्या हालचालींना वेग आला आहे. गेल्या काही काळापासून घाणेकर नाट्यगृहाला मोठ्या प्रमाणावर गळतीचा फटका बसला असून पावसाचे पाणी फॉल्स सीलिंगवर झिरपत असल्याने सुरक्षेचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने 1 जुलै पासून मिनी थिएटरच्या, तर 1 ऑगस्टपासून मुख्य नाट्यगृहाच्या दुरुस्ती कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली आहे.

3.5 कोटींच्या निधीतून आधुनिक सुविधांसह कायापालट होणार
या नूतनीकरण मोहिमेत मुख्य प्रेक्षागृहातील तातडीच्या कामांना प्राधान्य दिले जात आहे:
– पाणी गळती व प्लंबिंग: संपूर्ण छताचे वॉटरप्रूफिंग, ड्रेनेज लाइन दुरुस्ती आणि प्लंबिंगचे काम.
– विद्युत व वातानुकूलन: लाईट फिटिंग, वातानुकूलन (AC) यंत्रणा, एअर कर्टन आणि साउंड सिस्टिमचे आधुनिकीकरण.
– अंतर्गत सजावट व रंगमंच: रंगमंचावरील लाकडी लेव्हलचे नूतनीकरण, स्टेज दुरुस्ती, व्हीआयपी कक्षातील पडदे बदलणे आणि स्वच्छतागृहांची सुधारणा.
– डिजिटल फलक व सुरक्षा: नाटकांच्या जाहिरातींसाठी डिजिटल फलक उभारणे, रूफ गार्डन, मुख्य प्रवेशद्वारांची पाहणी आणि सुरक्षा यंत्रणेत आवश्यक बदल.

हेही वाचा – Mumbai Mayor Bomb Threat: 'मुलांना शाळेत पाठवू नका…'; 15 ऑगस्टपूर्वी महापौरांच्या कार्यालयाला बॉम्बेने उडवण्याची धमकी

शाळांची स्नेहसंमेलने कोलमडली; महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम
ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत घोडबंदर, मानपाडा, माजिवडा, खेवरा सर्कल आणि वसंत विहार परिसरातील अनेक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांची वार्षिक स्नेहसंमेलने घाणेकर नाट्यगृहात आयोजित केली जातात. नाट्यगृह 6 महिने बंद राहणार असल्याने यंदा या संस्थांना पर्यायी जागांचा शोध घ्यावा लागणार आहे, ज्यामुळे कार्यक्रमांचे नियोजन आणि खर्चाचे गणित बिघडणार आहे. तसेच या बुकिंगमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागल्याने ठाणे महापालिकेचेही आर्थिक नुकसान होणार आहे.

नव्या वर्षात आधुनिक रूपात रसिकांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता
ठाणे शहराला मोठा सांस्कृतिक वारसा लाभला असून येथे ज्येष्ठ कलाकारांचे वास्तव्य आहे. घाणेकर नाट्यगृहाचा वापर नाट्यप्रेमींसाठी सुरक्षित, सुकर आणि आधुनिक सुविधांनी युक्त व्हावा यासाठी हे काम वेगाने पूर्ण केले जात आहे. आगामी 6 महिन्यांची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर नव्या वर्षात हे नाट्यगृह एका नव्या आणि अधिक समृद्ध रूपात पुन्हा नाट्यरसिकांच्या सेवेत खुले होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा – International Cyber Fraud : मुंबई पोलिसांकडून आंतरराष्ट्रीय सायबर फ्रॉड रॅकेट उघड; गोव्यातून 12 जणांना अटक

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number