Mumbai Local Train : मुंबईकरांचं टेन्शन वाढलं! CSMT-गोरेगाव लोकल 45 दिवस बंद राहणार? ‘हे’ आहे कारण

जर हा निर्णय अंमलात आला, तर सीएसएमटीहून गोरेगावच्या दिशेने जाणाऱ्या सर्व हार्बर लोकल गाड्या केवळ वांद्रे स्थानकापर्यंत चालवल्या जातील.

Mumbai Local Train : मुंबईकरांचं टेन्शन वाढलं! CSMT-गोरेगाव लोकल 45 दिवस बंद राहणार? ‘हे’ आहे कारण

Mumbai Local Train Harbour Line 45 Days Megablock : पश्चिम रेल्वेवर उपनगरीय लोकल आणि लांब पल्ल्याच्या (मेल-एक्सप्रेस) गाड्यांची वाहतूक वेगळी करण्यासाठी मुंबई सेंट्रल ते बोरिवली दरम्यान 30 किलोमीटर लांबीच्या सहाव्या मार्गिकेचे काम वेगाने सुरू आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (MRVC) MUTP-2 प्रकल्पांतर्गत ही मार्गिका उभारली जात आहे. सध्या खार ते बोरिवली दरम्यान ही नवीन मार्गिका कार्यरत असून, आता मुंबई सेंट्रल ते खार दरम्यानच्या टप्प्याचे काम प्रगतीपथावर आहे.

वांद्रे-खार उड्डाणपुलाची पुनर्बांधणी अन् 45 दिवसांचा मेगाब्लॉक?
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भाग म्हणून वांद्रे आणि खार स्थानकांदरम्यान असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाची (Flyover) पुनर्बांधणी करणे अत्यावश्यक बनले आहे. हे तांत्रिक आणि जटिल काम पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाला सुमारे 45 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. यामुळे या कालावधीत हार्बर मार्गावरील सीएसएमटी (CSMT) ते गोरेगाव दरम्यान धावणाऱ्या थेट लोकल फेऱ्या प्रभावित होऊ शकतात.

हेही वाचा – Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्रात प्रवेशासाठी मिळाला आणखी वेळ

हार्बर लोकल केवळ वांद्रेपर्यंतच धावणार; वांद्रे स्थानकात नवा फलाट
जर हा निर्णय अंमलात आला, तर सीएसएमटीहून गोरेगावच्या दिशेने जाणाऱ्या सर्व हार्बर लोकल गाड्या केवळ वांद्रे स्थानकापर्यंत चालवल्या जातील. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी आणि फेऱ्यांचे नियोजन करण्यासाठी वांद्रे स्थानकात एक नवीन फलाट उभारण्याचेही प्रस्तावित आहे. या नव्या फलाटामुळे भविष्यात वांद्रे येथून अतिरिक्त लोकल फेऱ्या चालवणे रेल्वे प्रशासनाला शक्य होणार आहे.

प्रकल्पाची निविदा प्रक्रिया ऑगस्ट 2026 पासून; अंतिम निर्णयाची प्रतीक्षा
दरम्यान, या सहाव्या मार्गिकेच्या उभारणीसाठी आवश्यक असलेली मुख्य निविदा प्रक्रिया ऑगस्ट 2026 पासून राबवली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. लोकल सेवा 45 दिवस बंद ठेवण्याबाबत अद्याप रेल्वे प्रशासनाकडून कोणताही अधिकृत निर्णय किंवा अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र, रेल्वेतील वरिष्ठ सूत्रांच्या माहितीनुसार, प्रवाशांना त्रास कमीत कमी व्हावा, अशा पद्धतीने कामाचे नियोजन केले जात आहे.

हेही वाचा – BMC Officers Transfer : आयुक्तांच्या आदेशानंतर BMC तील सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या; अभियंत्यांना दिली अतिरिक्त जबाबदारी, नावे जाहीर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number