Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांचा राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा; 14 दिवसांच्या मुदतीपूर्वीच सोडलं खासदारपद, नेमकं कारण काय?

बारामती विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवल्यानंतर त्या आता राज्याच्या राजकारणात सक्रिय होणार असून, विधानसभेत बारामतीकरांचे नेतृत्व करणार आहेत.

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांचा राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा; 14 दिवसांच्या मुदतीपूर्वीच सोडलं खासदारपद, नेमकं कारण काय?

Sunetra Pawar: बारामतीच्या नवनिर्वाचित आमदार सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा अधिकृतपणे राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी असलेल्या सुनेत्रा पवार यांनी दिल्लीत उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन आपले राजीनामा पत्र सुपूर्द केले. बारामती विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवल्यानंतर त्या आता राज्याच्या राजकारणात सक्रिय होणार असून, विधानसभेत बारामतीकरांचे नेतृत्व करणार आहेत.

राजीनाम्यासाठी आजचा दिवस का निवडला?
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, यामागे ‘लोकप्रतिनिधी कायदा 1951’ मधील एक महत्त्वाची तांत्रिक तरतूद कारणीभूत आहे.

14 दिवसांचा नियम – 
कायद्यानुसार, जर एखादा खासदार विधानसभेवर निवडून आला, तर त्याला निकाल लागल्यापासून 14 दिवसांच्या आत कोणत्याही एका सभागृहाचा राजीनामा देणे अनिवार्य असते.

सदस्यत्व रद्द होण्याची भीती –
जर या विहित मुदतीत राजीनामा दिला नाही, तर संबंधित लोकप्रतिनिधीचे आधीचे सदस्यत्व (या प्रकरणात राज्यसभा) नियमानुसार संपुष्टात येते. त्यामुळे कोणताही तांत्रिक पेच निर्माण होऊ नये म्हणून सुनेत्रा पवार यांनी ही मुदत संपण्यापूर्वीच आपले पद सोडले आहे.

हेही वाचा – Ladki Bahin Yojana : मार्च-एप्रिलचे हप्ते थकले, लाडक्या बहिणी चिंतेत; उदय सामंत नेमकं काय म्हणाले?

काय आहे ‘लोकप्रतिनिधी कायदा 1951’?
भारतीय लोकशाहीत निवडणुका पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी हा कायदा अत्यंत कळीचा मानला जातो. उमेदवारांची पात्रता ठरवणे, एकाच वेळी दोन सभागृहांचे सदस्य राहण्यास प्रतिबंध करणे आणि निवडणूक विवादांचे निराकरण करणे ही या कायद्याची मुख्य उद्दिष्टे आहेत.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number