Mumbai Slums BMC Action: मुंबईतील झोपडपट्टीधारकांना बीएमसीचा मोठा धक्का; 14 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या अनधिकृत बांधकामांवर थेट हातोडा चालवणार

1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीत पालिकेकडून संपूर्ण मुंबईत अनधिकृत बांधकामांविरोधात विशेष मोहीम राबवली जाणार आहे.

Mumbai Slums BMC Action: मुंबईतील झोपडपट्टीधारकांना बीएमसीचा मोठा धक्का; 14 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या अनधिकृत बांधकामांवर थेट हातोडा चालवणार

Mumbai Slums BMC Action: मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये नियमांचे उल्लंघन करून उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) कडक कारवाईचा इशारा दिला आहे. 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीत पालिकेकडून संपूर्ण मुंबईत अनधिकृत बांधकामांविरोधात विशेष मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत 14 फूट आणि त्यापेक्षा अधिक उंची असलेल्या झोपड्यांचे निष्कासन केले जाणार आहे. पालिका प्रशासनाने संबंधित रहिवाशांना इशारा दिला असून, ही अनधिकृत बांधकामे स्वतःहून तात्काळ न हटवल्यास प्रशासनाकडून ती पाडली जातील, असा अंतिम इशारा देण्यात आला आहे.

पालिका आयुक्तांच्या आदेशानुसार मोहीम; हजारो झोपडपट्ट्या रडारवर
महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या निर्देशांनुसार आणि अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई आयोजित करण्यात आली आहे. बीएमसीने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, संपूर्ण बृहन्मुंबई क्षेत्रात एकूण 2,23,150 झोपड्यांची नोंद असून त्यांपैकी 39,111 झोपड्यांनी 14 फुटांची मर्यादा ओलांडल्याचे समोर आले आहे. यामध्ये पूर्व उपनगरांत सर्वाधिक 31,227, पश्चिम उपनगरांत 4,536 तर शहर विभागात 3,348 झोपड्यांचा समावेश आहे. यापैकी 4,584 झोपड्यांवर आधीच निष्कासनाची कारवाई झाली असून 611 झोपड्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

हेही वाचा – LPG Latest Update: वेळ निघून जाण्यापूर्वी बायोमेट्रिक अपडेट करा, नाही तर गॅस सिलेंडर बाजारभावात विकत घ्यावा लागेल..

वॉर्ड स्तरावर सातत्याने कारवाई; 15 सप्टेंबरपर्यंत 128 बांधकामे जमीनदोस्त
मुंबईतील अनधिकृत बांधकामांवर बीएमसीच्या विविध प्रशासकीय विभागांकडून (वॉर्ड) सातत्याने हातोडा चालवला जात आहे. उपलब्ध माहितीनुसार, 24 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2026 या कालावधीत महापालिकेने 128 अनधिकृत बांधकामे हटवली आहेत, तर 140 इतर बांधकामांवर कारवाई नियोजित आहे. अलीकडच्या काळात जागेच्या टंचाईमुळे अनेक झोपडपट्ट्यांमध्ये तीन मजली इमारतींसारखी उंच घरे बांधण्याची चढाओढ निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अनधिकृत बांधकामे स्वतःहून काढून घ्यावीत, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

रहिवाशांमध्ये घबराट अन् तीव्र विरोधाची शक्यता
पालिकेच्या या अंतिम वॉर्निंगमुळे मुंबईतील लाखो झोपडपट्टीधारकांचे धाबे दणाणले असून त्यांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. सणासुदीच्या काळात सुरु होणाऱ्या या मोहिमेमुळे झोपडपट्ट्यांमध्ये तीव्र सामाजिक व राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तीन मजली घरे स्वतःहून पाडणे सर्वसामान्य नागरिकांसाठी कठीण असल्याने, बीएमसीच्या या धडक मोहिमेला ठिकठिकाणी रहिवाशांकडून तीव्र विरोधाचा सामना करावा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा – Traffic Jam Toward Mumbai : एसटी बस फुल… महामार्गावर गाड्यांच्या रांगा… प्रचंड वाहतूक कोंडी; बाप्पाच्या विसर्जनानंतर कोकणवासी मुंबईच्या दिशेने निघाले

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number