Cracker Factory Blast: काळजाचा थरकाप उडवणारी घटना! फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; 19 कामगारांचा होरपळून मृत्यू

कारखान्यातील स्फोट इतका भीषण होता की, त्याचे हादरे कित्येक किलोमीटरपर्यंत जाणवले. या धक्क्यामुळे कट्टनारपट्टी येथील आजूबाजूच्या अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले.

Cracker Factory Blast: काळजाचा थरकाप उडवणारी घटना! फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; 19 कामगारांचा होरपळून मृत्यू

Cracker Factory Blast: तामिळनाडूच्या विरुधुनगर जिल्ह्यात आज भीषण दुर्घटना घडली. येथील कट्टनारपट्टी भागातील एका फटाका निर्मिती कारखान्यात झालेल्या जोरदार स्फोटात 19 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. अग्निशमन आणि बचाव सेवा विभागाने या दुर्दैवी घटनेला दुजोरा दिला असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

परिसरात युद्धासारखी परिस्थिती; घरांचे मोठे नुकसान
कारखान्यातील स्फोट इतका भीषण होता की, त्याचे हादरे कित्येक किलोमीटरपर्यंत जाणवले. या धक्क्यामुळे कट्टनारपट्टी येथील आजूबाजूच्या अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले असून खिडक्यांच्या काचाही फुटल्या आहेत. स्फोटानंतर परिसरात काळोखाचे साम्राज्य पसरले आणि जीव वाचवण्यासाठी नागरिकांची मोठी धावपळ उडाली. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

ढिगारा हटवण्याचे काम युद्धपातळीवर
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, स्थानिक पोलीस आणि आपत्ती निवारण पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. ढिगाऱ्याखाली काही कामगार अडकले असण्याची शक्यता असल्याने अवजड यंत्रसामग्रीच्या साहाय्याने बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने हा संपूर्ण परिसर सील केला असून, मदतीसाठी अतिरिक्त पथके पाचारण करण्यात आली आहेत.

हेही वाचा – LPG Crisis : मध्य पूर्वेतील युद्धामुळे जनतेला गॅस टंचाईचे चटके! भारतात गॅसच्या वापरात 13 टक्क्यांची घट; समोर आली धक्कादायक आकडेवारी

सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचा संशय
प्राथमिक तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, फटाके बनवताना रासायनिक द्रव्यांच्या हाताळणीत झालेला निष्काळजीपणा या स्फोटाला कारणीभूत असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. कारखान्यात सुरक्षा मानकांचे योग्य पालन झाले होते का, याची तपासणी आता केली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून, जखमींना तातडीने सर्वोत्तम वैद्यकीय उपचार देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number