Netra Mantena Wedding: उदयपूर शहरात सध्या तगडा हाय अलर्ट असूनही, तिथे सुरू असलेल्या एका भव्य शाही लग्नाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. नेत्रा मंटेना आणि वामशी गदिराजू यांच्या तीन दिवसांच्या लग्न समारंभाला 21 नोव्हेंबरला सुरुवात झाली आणि 23 नोव्हेंबर रोजी राजेशाही थाटात त्यांच्या लग्नाची सांगता झाली. या सोहळ्यात बॉलिवूड तसेच हॉलिवूडमधील अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी हजेरी लावली. यामध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पुत्र डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर हे त्यांच्या मैत्रिणीसह या लग्नाला उपस्थित राहिले. त्यांच्यासोबत काही आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टार्सही उपस्थित होते. त्यामुळे या लग्नाचा ग्लॅमर आणि लोकप्रियता अक्षरशः शिखरावर पोहोचल्याचे दिसून आले.
नेत्रा मंटेना कोण?
नेत्रा मंटेना ही भारतीय-अमेरिकन अब्जाधीश उद्योगपती रमा राजू मंटेना आणि पद्मजा मंटेना यांची एकुलती एक मुलगी आहे. रमा राजू मंटेना हे अमेरिकेतील औषध उद्योगातील एक मोठे नाव असून, ते ऑरलँडोस्थित इंजेनस फार्मास्युटिकल्सचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांची कंपनी कर्करोग आणि मानसिक आजारांवर लक्ष केंद्रित करणारी जेनेरिक औषधे विकसित करते. मंटेना यांनी इंटरनॅशनल ऑन्कोलॉजी नेटवर्क, आयकोर हेल्थकेअर, ऑन्कोस्क्रिप्ट्स अशा अनेक महत्त्वाच्या हेल्थकेअर उपक्रमांना आकार दिला आहे.
वामसी गदिराजू कोण?
दरम्यान, नेत्राचा पती वामसी गदिराजू हे टेक जगतातील अव्वल नावांपैकी एक. ते न्यूयॉर्कस्थित Superorder या स्टार्टअपचे सहसंस्थापक आणि CTO आहेत. Superorder हे एआय आधारित ऑल-इन-वन प्लॅटफॉर्म आहे जे रेस्टॉरंट व्यवसायांचे व्यवस्थापन, वेबसाइट बिल्डिंग आणि ऑटोमेशनमध्ये मदत करते. वामशी गदिराजू यांनी कोलंबिया विद्यापीठातून शिक्षण घेतले असून, 2024 मध्ये त्यांची निवड Forbes 30 Under 30 यादीत झाली होती.
उदयपूरमध्ये ‘वर्षातील सर्वात महागडे लग्न’
तथापी, 23 नोव्हेंबर 2025 रोजी उदयपूरमध्ये झालेले हे लग्न आजवरच्या सर्वात महागड्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत असलेल्या लग्नांपैकी एक ठरले आहे. या शाही सोहळ्यातील स्टार परफॉर्मन्सने सर्वांची नजर खिळवली. रणवीर सिंग, शाहिद कपूर, माधुरी दीक्षित, वरुण धवन या सेलिब्रिटींनी खास सादरीकरण करून या सोहळ्याला चार चांद लावले. या लग्नातील तडफदार कार्यक्रम, लाखो डॉलर खर्चाची सजावट, विदेशी पाहुण्यांची उपस्थिती आणि सुरक्षा व्यवस्था या सगळ्यामुळे हा सोहळा जगभर चर्चेत आला.