Agriculture News : शेतकऱ्यांसाठी मोठी सोय! 7/12 उतारा WhatsApp वर कसा मिळवायचा? जाणून घ्या 3 सोप्या स्टेप्स

शेतकरी आणि जमीनधारकांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे.भूमी अभिलेख विभागाकडून 7/12 उतारा, 8-अ उतारा आणि मिळकत पत्रिका मिळवण्यासाठीची प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी डिजिटल सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्यामुळेच नागरिकांना प्रत्येक वेळी सेतू केंद्र किंवा महा ई-सेवा केंद्रात जाण्याची गरज पडणार नाही. 7/12 उतारा मिळवणे झाले सोपे आता घरबसल्या मोबाईलच्या माध्यमातून […]

Agriculture News : शेतकऱ्यांसाठी मोठी सोय! 7/12 उतारा WhatsApp वर कसा मिळवायचा? जाणून घ्या 3 सोप्या स्टेप्स
Agriculture News

शेतकरी आणि जमीनधारकांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे.भूमी अभिलेख विभागाकडून 7/12 उतारा, 8-अ उतारा आणि मिळकत पत्रिका मिळवण्यासाठीची प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी डिजिटल सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्यामुळेच नागरिकांना प्रत्येक वेळी सेतू केंद्र किंवा महा ई-सेवा केंद्रात जाण्याची गरज पडणार नाही.

7/12 उतारा मिळवणे झाले सोपे
आता घरबसल्या मोबाईलच्या माध्यमातून आवश्यक असलेली कागदपत्रे मिळवण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे, ही कागदपत्रे ही कागदपत्रे ही आता व्हॉट्सअॅप वर डिजिटल स्वरुपात मिळू शकतात, त्यामुळेच असंख्य नागरिकांचा वेळ, प्रवासाचा खर्च आणि कार्यालयात जाण्याचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे.

https://jaimaharashtranews.com/politics/buldhana-chikhli-leader-rahul-bondre-who-withdrew-from-joining-bjp-after-rahul-gandhis-call-is-not-reachable/60237

ही सेवा वापरण्याची प्रक्रिया काय?
ही सुविधा वापरण्यासाठी नागरिकांना महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत महाभूमी पोर्टलवर जावे लागेल. त्यानंतर संबंधित सेवेमध्ये आपला अधिकृत असलेला मोबाईल नंबर नोंदवावा. नोंदणी करत असताना व्हॉट्सअॅप वर वापरत असलेलाच मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे.

यानंतर आवश्यक कागदपत्राची निवड करुन ऑलाइन शुल्क भरावे. महत्त्वाचे म्हणजे, उताऱ्यासाठी 15 रुपये शुल्क आकारले जातील, अशी माहिती मिळत आहे.मात्र, ही सेवा वापरण्यापूर्वी महाभूमीच्या अधिकृत संकेतस्थळावर सध्याचे शुल्क आणि नियम तपासणे अत्यंत आवश्यक आहे.

सर्व ऑलाइन प्रक्रिया पूर्ण होताच संबंधित 7/12 किंवा 8-अ उतारा हा व्हॉट्सअॅपवर पीडीएफ स्वरुपात पाठवला जाऊ शकतो. ही पीडीएफ मोबाईलमध्ये डाउनलोड करावी.या डिजिटल सुविधेमुळे नागरिकांना छोट्या कामासाठी केंद्रांवर वारंवार जाण्याची गरज कमी होणार आहे. रांगते उभे राहण्याचाही वेळ वाचेल आणि कागदपत्र मिळवण्याची प्रक्रिया अधिक सोपी होईल. तसेच अधिकृत डिजिटल माध्यमातून कागदपत्र मिळत असल्याने या प्रक्रियेत पारदर्शकता ही वाढण्यास मदत होऊ शकते.

https://jaimaharashtranews.com/maharashtra-marathi-news/mira-bhayander-school-prohibits-students-from-bringing-green-fenugreek-in-their-school-bags/60235

सुरुवातील ही सेवा काही जिल्ह्यांमध्येच प्रायोगिक तत्त्वावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद आणि सेवेचा येणारा अनुभव पाहूनच भविष्यात ती महाराष्ट्रातील अन्य भागांतही टप्प्याटप्याने सुरु केली जाऊ शकते. त्यामुळेच 7/12 आणि 8-अ किंवा मिळकत पत्रिका काढण्याआधीच महाभूमीच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन आपल्या जिल्ह्यासाठी ही सुविधा उपलब्ध आहे शिवाय सध्याचे शुल्क आणि प्रक्रिया काय आहे. हे नक्की तपासा.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number