बुलढाणा जिल्ह्यातील राजकारणात सध्या खळबळ उडाली आहे. भाजपमध्ये पक्षप्रवेश करणाऱ्या राहुल बोंद्रेंनी अचानक त्यांच्या निर्णयावरून माघार घेतली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे खंदे समर्थक, माजी आमदार आणि माजी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत आपल्या राजकीय भूमिकेची अधिकृत घोषणा केली होती. त्यांनी फेसबुक लाईव्ह करीत भाजपमध्ये जाण्याची घोषणाही केली होती. मात्र लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी फोनवरून चर्चा केल्यानंतर राहुल बोंद्रे यांनी आपला निर्णय बदलत काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा- rahul gandhi and Rahul Bondre : राहुल गांधींच्या एका फोनने समीकरणच बदललं; काँग्रेस नेता भाजपच्या उंबरठ्यावरुन माघारी फिरला
राहुल बोंद्रे नॉट रिचेबल
अशातच आता पुन्हा एकदा मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. राहुल बोंद्रे नॉट रिचेबल असून राहुल बोंद्रे यांचा मोबाईल बंद दाखवत आहे. राहुल बोंद्रे भूमिगत झाले आहेत. आज राहुल बोंद्रे यांचा भाजपा प्रवेश होणार होता. मात्र भाजप प्रवेशाच्या अगोदरच राहुल गांधींनी बोंद्रे यांना फोन करत त्यांच्यासोबत चर्चा केली. दरम्यान रात्री पासून बोंद्रे मोबाईल बंद करून भूमिगत झाले असल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी बोंद्रे दिल्लीला गेल्याची सूत्रांची माहिती समोर आली असून आज मुंबईमध्ये बोंद्रे यांच्या प्रवेशाची तयारी होत असताना दुसरीकडे बोंद्रे भूमिगत झाले आहेत.
तर एका तासा अगोदर बोंद्रे यांची फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे. बचेगे तो और भी लढेंगे म्हणत काँग्रेस सोडणार नसल्याची पोस्ट त्यांनी केली. यावेळी त्यांनी “बचेंगे तो और भी लडेंगे”-कर्मयोगी तात्यासाहेबांची शिकवण..” असं कॅप्शन देखील दिलं आहे. त्यामुळे बुलडाण्याच्या राजकारणात मोठा उलटफेर होण्याची शक्यता आहे.
राहुल गांधींच्या फोननंतर राहुल बोंद्रेंनी निर्णय बदलला
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांना फोन करत त्यांच्यासोबत चर्चा केल्याचे समोर आले आहे. यावेळी संकटाच्या काळात धीर सोडू नका, असं आवाहन राहुल गांधी यांनी राहुल बोंद्रे यांना दिलं. त्यानंतर भाजपमध्ये जाण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याबाबतचा शब्द राहुल बोंद्रे यांनी राहुल गांधींना दिला.
त्यावर ‘तुमचा फोन आल्यामुळे मी माझा निर्णय बदलत आहे आणि सर्व गमावलं तरी मी तुमच्या सोबत कायम लढत राहील’. अस राहुल बोंद्रे या व्हायरल व्हिडिओत राहुल गांधी यांच्याशी बोलताना पाहायला मिळाले आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी राहुल बोंद्रे यांनी व्हिडिओ जारी करत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर आता राहुल गांधी यांनी आवाहन केल्यानंतर राहुल बोंद्रे यांचा भाजप प्रवेश होणार का? याकडे लक्ष लागले आहे.