Egg Expiry Date : आता अंड्यावरही असणार ‘एक्सपायरी डेट’! ‘या’ राज्याचा मोठा निर्णय; शिळी अंडी विकणाऱ्यांचे धाबे दणाणले

आतापर्यंत सामान्य ग्राहकांकडे अंडी किती जुनी आहेत हे ओळखण्यासाठी कोणतेही वैज्ञानिक साधन उपलब्ध नव्हते. केवळ दुकानदाराच्या शब्दावर विश्वास ठेवून ग्राहक अंडी खरेदी करत असत. पण आता...

Egg Expiry Date : आता अंड्यावरही असणार ‘एक्सपायरी डेट’! ‘या’ राज्याचा मोठा निर्णय; शिळी अंडी विकणाऱ्यांचे धाबे दणाणले

Egg Expiry Date :  अंडी खाणाऱ्या लाखो ग्राहकांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. आता राज्यातील अंड्यांच्या विक्रीची जुनी पद्धत पूर्णपणे बदलणार आहे. नव्या नियमांनुसार, उत्तर प्रदेशात विक्रीसाठी येणाऱ्या प्रत्येक अंड्यावर त्याची उत्पादन तारीख (Production Date) आणि एक्सपायरी डेट (Expiry Date) असणे अनिवार्य करण्यात आले आहे. हा महत्त्वपूर्ण नियम 1 एप्रिल 2026 पासून संपूर्ण राज्यात लागू होणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने हे मोठे पाऊल उचचले आहे.

ग्राहकांच्या आरोग्याला मिळणार सर्वोच्च प्राधान्य
आतापर्यंत सामान्य ग्राहकांकडे अंडी किती जुनी आहेत हे ओळखण्यासाठी कोणतेही वैज्ञानिक साधन उपलब्ध नव्हते. केवळ दुकानदाराच्या शब्दावर विश्वास ठेवून ग्राहक अंडी खरेदी करत असत. यामुळे अनेकदा शिळी अंडी खाल्ल्याने 'फूड पॉयझनिंग' किंवा पोटाचे विकार होण्याचा धोका राहायचा. आता अंड्यावर लागलेल्या शिक्क्यामुळे ग्राहकांना ते अंडी खाण्यायोग्य आहेत की नाही, हे स्वतः तपासता येईल. या पारदर्शकतेमुळे ग्राहकांच्या पैशाची योग्य किंमत मिळेल आणि त्यांच्या आरोग्याचेही रक्षण होईल.

हेही वाचा – Women's Reservation Bill: नारी शक्तीचा एल्गार! सीमांकनापूर्वीच महिला आरक्षण होणार लागू? केंद्र सरकारच्या हालचालींना वेग

तापमान आणि साठवणुकीचे कडक निकष
तज्ज्ञांच्या मते, अंड्यांची गुणवत्ता ही प्रामुख्याने तापमानावर अवलंबून असते. सामान्य तापमानात म्हणजेच 30°C वर अंडी केवळ 2 आठवडे सुरक्षित राहतात. मात्र, जर ही अंडी कोल्ड स्टोरेजमध्ये 2°C ते 8°C तापमानावर ठेवली, तर ती 5 आठवड्यांपर्यंत वापरता येतात. नव्या नियमांनुसार, अंडी ही भाज्यांसोबत साठवता येणार नाहीत, कारण या दोन्ही वस्तूंच्या तापमानाची गरज वेगळी असते. उत्तर प्रदेशात सध्या अंड्यांसाठी विशेष कोल्ड स्टोरेजची संख्या मर्यादित असली, तरी सरकार साठवणुकीच्या पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर देत आहे.

भेसळ रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाचा पुढाकार
हा नियम लागू करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग आणि अन्न सुरक्षा विभागाने संयुक्तपणे निर्देश जारी केले आहेत. ताज्या अंड्यांच्या नावाखाली जुन्या किंवा खराब मालाची विक्री करणाऱ्या भेसळखोरांवर लगाम घालणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. 1 एप्रिलपासून जर एखाद्या दुकानदाराने विना शिक्क्याची किंवा मुदत संपलेली अंडी विकल्यास, त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील कुक्कुटपालन व्यवसायातही अधिक व्यावसायिकता आणि शिस्त येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा – LPG eKYC Update: गॅस ग्राहकांनो लक्ष द्या! प्रत्येकालाच e-KYC करण्याची गरज नाही, जाणून घ्या कोणासाठी आहे अनिवार्य

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number