Nirmala Sitharaman: ‘काँग्रेसला उपाय नको, फक्त…’; NEET पेपरफुटीवरून निर्मला सीतारामन यांचा राहुल गांधींवर निशाणा

केंद्र सरकार तरुण वर्ग आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत पूर्णपणे संवेदनशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Nirmala Sitharaman: ‘काँग्रेसला उपाय नको, फक्त…’; NEET पेपरफुटीवरून निर्मला सीतारामन यांचा राहुल गांधींवर निशाणा

Nirmala Sitharaman: नीटसह इतर स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याच्या वादावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विरोधकांवर, विशेषतः काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. केंद्र सरकार तरुण वर्ग आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत पूर्णपणे संवेदनशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याउलट, काँग्रेसला या गंभीर समस्येवर कोणताही मार्ग काढायचा नसून केवळ राजकीय भांडवल करायचे आहे, असा घणाघाती आरोप त्यांनी केला.

'आम्ही गप्प बसलो नाही, तातडीने कठोर कारवाई केली'
ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना सीतारामन यांनी सांगितले की, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी पेपरफुटी आणि फेरपरीक्षा हे अत्यंत नाजूक विषय असतात. सरकारने या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले असते तर विरोधकांचा आक्षेप रास्त ठरला असता; परंतु केंद्र सरकारने सुरुवातीपासूनच यावर तातडीने पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः या प्रकरणी कठोर भूमिका घेतली असून, परीक्षेचे पावित्र्य भंग करणाऱ्या एकाही दोषीला सोडले जाणार नाही, असा विश्वास दिला आहे. प्रकरणात गतीने न्याय मिळण्यासाठी विशेष Fast-Track Courts स्थापन केले जात असून त्याद्वारे कठोर शिक्षेची तरतूद केली जाईल.

हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात घालणारे मास्टरमाईंड जेरबंद
अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले की, स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य दावणीला लावणाऱ्या सर्व दोषींना आधीच बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ज्यांनी प्रश्नपत्रिकांची खरेदी-विक्री केली आणि पेपर लीक केले, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. Fast-Track Courts च्या माध्यमातून अशा गुन्हेगारांवर लवकरात लवकर खटले चालवून शिक्षा दिली जाईल, ज्यामुळे भविष्यात संपूर्ण परीक्षा पद्धतीतील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांचा विश्वास अधिक मजबूत होईल.

हेही वाचा – CJP Nationwide Protest: कॉकरोच जनता पार्टी आक्रमक; पोलीस अत्याचाराविरोधात उद्या देशव्यापी आंदोलनाची हाक

फेरपरीक्षांमुळे प्रवेश प्रक्रियेवर परिणाम नाही; विद्यार्थ्यांनी आव्हानाचा केला सकारात्मक वापर
प्रतिकूल परिस्थितीतही सरकारने अतिशय नियोजनबद्ध रीतीने फेरपरीक्षा पार पाडून त्यांचे निकाल वेळेत जाहीर केले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या पुढील उच्च शिक्षण प्रवेश प्रक्रियेत कोणताही अडथळा आला नाही आणि ते सुरळीतपणे प्रवेश घेत आहेत. या संपूर्ण काळात अनेक विद्यार्थ्यांनी खचून न जाता अतिरिक्त मिळालेल्या वेळेचा उपयोग अधिक अभ्यासासाठी केला आणि आपल्या निकालात सुधारणा केली. नवी पिढी आव्हानांचे रूपांतर संधीत करत असल्याचे हे उत्तम उदाहरण असून, केंद्र सरकार नेहमीच विद्यार्थ्यांच्या हितासाठी कटिबद्ध राहील, असा पुनरुच्चार त्यांनी केला.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number