Pakistan Terrorist Squad: ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानचा नवा कट उघड! गुप्तचर अहवालात धक्कादायक खुलासा

गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबा (LeT) आणि जैश-ए-मोहम्मद (JeM) हे दोन कुख्यात दहशतवादी गट एकत्र येऊन नव्या हल्ल्यांची योजना आखत आहेत.<br/>

Pakistan Terrorist Squad: ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानचा नवा कट उघड! गुप्तचर अहवालात धक्कादायक खुलासा

Pakistan Terrorist Squad: ‘ऑपरेशन सिंदूर’ला सहा महिने पूर्ण होत असताना जम्मू आणि काश्मीरमध्ये पुन्हा तणाव वाढवणारा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबा (LeT) आणि जैश-ए-मोहम्मद (JeM) हे दोन कुख्यात दहशतवादी गट एकत्र येऊन नव्या हल्ल्यांची योजना आखत आहेत.

गुप्तचर अहवालात मोठा इशारा

अहवालानुसार, पाकिस्तानमधील मुरीदके, बहावलपूर आणि रावळपिंडी परिसरात दहशतवादी शिबिरे पुन्हा सक्रिय झाली आहेत. तेथून प्रशिक्षित दहशतवाद्यांना सीमेवर घुसखोरीसाठी सज्ज करण्यात येत आहे. भारताच्या गुप्तचर संस्थांनी या हालचालींवर बारीक नजर ठेवली असून, सीमावर्ती भागात सुरक्षा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याची पार्श्वभूमी

दरम्यान, 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम परिसरात झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांना प्राण गमवावे लागले. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या गटाने स्वीकारली होती. या क्रूर हल्ल्यानंतर भारताने 6-7 मेच्या दरम्यान ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले आणि पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवर हवाई आणि जमिनीवरून  कारवाई केली.

हेही वाचा – Narendra Modi – Donald Trump : 'ट्रम्प यांना पंतप्रधान मोदींचा मोठा आदर…'; व्हाईट हाऊसने दिली मोदी-ट्रम्प संबंधाबद्दल 'ही' माहिती

'ऑपरेशन सिंदूर' द्वारे पहलगाम हल्ल्याचा बदला

भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पीओके आणि पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आणि जैश-ए-मोहम्मदच्या किमान 30 दहशतवाद्यांसह 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचे चार, लष्कर-ए-तोयबा तीन आणि हिजबुल मुजाहिदीनच्या दोन दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले. जैश आणि लष्करचे मुख्यालय उद्ध्वस्त करण्यात आले. या ऑपरेशननंतर पाकिस्तानकडून सीमेवरील गोळीबार आणि ड्रोनद्वारे हल्ले करण्यात आलेय यावर प्रत्युत्तर देत भारताने सीमावर्ती भागात आणि पाकिस्तानातील हवाई तळांवर  हल्ले केले. या कारवाईत पाकिस्तानच्या रडार, संपर्क केंद्रे आणि कमांड पोस्टचे मोठे नुकसान झाले.

हेही वाचा – जगातील 9 सर्वात शक्तिशाली अण्वस्त्रधारी देश; भारताचे स्थान कुठे? जाणून घ्या कोणाकडे किती अण्वस्त्रे

10 मे रोजी युद्धबंदीचा करार

दोन्ही देशांमधील तीव्र तणावानंतर, 10 मे रोजी युद्धबंदीचा करार करण्यात आला. मात्र आता नव्या गुप्तचर अहवालाने पुन्हा चिंता वाढवली आहे. अहवालात म्हटले आहे की, लष्कर आणि जैश हे पुन्हा एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावर हल्ल्यांची योजना आखत आहेत. या योजनेचा उद्देश ‘ऑपरेशन सिंदूर’चा बदला घेणे आणि जम्मू-काश्मीरमध्ये अस्थिरता निर्माण करणे हा आहे.  दरम्यान, गुप्तचर अहवालानंतर भारतातील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) कार्यालय, गृहमंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय यांनी संयुक्त बैठक घेतली आहे. जम्मू-काश्मीर आणि सीमेवर उच्च सतर्कता आदेश जारी करण्यात आला असून, ड्रोन मॉनिटरिंग आणि रात्रीच्या गस्तीत वाढ करण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number