rahul gandhi and Rahul Bondre : राहुल गांधींच्या एका फोनने समीकरणच बदललं; काँग्रेस नेता भाजपच्या उंबरठ्यावरुन माघारी फिरला

बुलढाण्यातून मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे खंदे समर्थक, माजी आमदार आणि माजी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे भाजपच्या उंबरठ्यावरुन माघारी फिरले आहेत.

rahul gandhi and Rahul Bondre : राहुल गांधींच्या एका फोनने समीकरणच बदललं; काँग्रेस नेता भाजपच्या उंबरठ्यावरुन माघारी फिरला

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील राजकारणात एक अत्यंत मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे खंदे समर्थक, माजी आमदार आणि माजी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे भाजपच्या उंबरठ्यावरुन माघारी फिरले आहेत. राहुल बोंद्रे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ संदेश जारी करत आपल्या या राजकीय भूमिकेची अधिकृत घोषणा केली होती.

त्यांनी फेसबुक लाईव्ह करीत भाजपमध्ये जाण्याची घोषणाही केली होती. त्यामुळे राहुल बोंद्रे यांच्या या निर्णयाने काँग्रेसचा मोठा धक्का बसणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी फोनवरून चर्चा केल्यानंतर राहुल बोंद्रे यांनी आपला निर्णय बदलत काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा- Rohit Pawar : राज्यात दुष्काळाचं सावट, रोहित पवार शेतकऱ्यांसाठी मैदानात; सरकारला इशारा, म्हणाले 'लवकरात लवकर 50 हजारांची मदत…'

यानंतर आता कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांना फोन करत त्यांच्यासोबत चर्चा केल्याचे समोर आले आहे. यावेळी संकटाच्या काळात धीर सोडू नका, असं आवाहन राहुल गांधी यांनी राहुल बोंद्रे यांना दिलं. त्यानंतर भाजपमध्ये जाण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याबाबतचा शब्द राहुल बोंद्रे यांनी राहुल गांधींना दिला.

त्यावर 'तुमचा फोन आल्यामुळे मी माझा निर्णय बदलत आहे आणि सर्व गमावलं तरी मी तुमच्या सोबत कायम लढत राहील'. अस राहुल बोंद्रे या व्हायरल व्हिडिओत राहुल गांधी यांच्याशी बोलताना पाहायला मिळाले आहेत. या सर्व घडामोडींनंतर राहुल बोंद्रे यांच्या चिखली स्थित निवासस्थानासमोर समर्थकांची मोठी गर्दी जमली होती.

दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी राहुल बोंद्रे यांनी व्हिडिओ जारी करत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर आता राहुल गांधी यांनी आवाहन केल्यानंतर राहुल बोंद्रे यांचा भाजप प्रवेश होणार का? याकडे लक्ष लागले आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number