Bangladesh Violence : आधी बेदम मारहाण, मग बळजबरीने विष पाजलं…; बांगलादेशात आणखी एका हिंदूला संपवलं

महापात्रोच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक हल्लेखोरांनी प्रथम त्यांना बेदम मारहाण केली आणि त्यानंतर बळजबरीने विष पाजले.

Bangladesh Violence : आधी बेदम मारहाण, मग बळजबरीने विष पाजलं…; बांगलादेशात आणखी एका हिंदूला संपवलं

Bangladesh Violence : बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांवरील अत्याचाराची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. सुनामगंज जिल्ह्यात जॉय महापात्रो या हिंदू व्यक्तीची अत्यंत क्रूरपणे संपवण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महापात्रोच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक हल्लेखोरांनी प्रथम त्यांना बेदम मारहाण केली आणि त्यानंतर बळजबरीने विष पाजले. प्रकृती खालावल्याने त्यांना सिल्हेट येथील एमएजी उस्मानी मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र आयसीयूमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे स्थानिक हिंदू समुदायामध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा – Afghan Embassy in Delhi : तालिबानचा 'पावरफुल' अधिकारी दिल्लीत; भारतातील दूतावासात अफगाणिस्तानकडून नूर अहमद नूर यांची नियुक्ती

मोहम्मद युनूस यांच्या कार्यकाळात हल्ल्यांत वाढ 

बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या कार्यकाळात अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत नरसिंगदी शहरात 40 वर्षीय किराणा व्यापारी मोनी चक्रवर्ती यांची धारदार शस्त्राने वार करून संपवण्यात आलं. तसेच 5 जानेवारी रोजी जशोर येथे पत्रकार आणि व्यापारी राणा प्रताप यांना गोळ्या झाडून संपवण्यात आलं. या लागोपाठ होणाऱ्या घटनांमुळे हिंदू समुदायामध्ये संतापाची लाट उसळली आहे.

हेही वाचा – Venezuelan Oil for India : व्हेनेझुएलाचे तेल भारताला मिळणार? ट्रम्प प्रशासनाचे हिरवे कंदील; पण या अटी..

ईशनिंदेच्या नावाखाली क्रूरता 

मानवाधिकार संघटनांनी बांगलादेशातील ढासळत्या कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. डिसेंबर महिन्यात मैमनसिंग येथे दीपू चंद्र दास या कामगाराला ईशनिंदेच्या आरोपाखाली संपवण्यात आलं आणि त्याचा मृतदेह झाडाला बांधून जाळण्यात आला होता. त्यानंतर शरीयतपूरमध्ये खोकन चंद्र दास यांचाही चाकूने वार करून जीव घेण्यात आला. दरम्यान, स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून गुन्हेगारांविरुद्ध होणारी दिरंगाई आणि कमकुवत कारवाईमुळे हल्लेखोरांचे मनोधैर्य वाढत असल्याची टीका अल्पसंख्याक समुदायाकडून केली जात आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number