युद्धबंदीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे आणखी एक विधान; म्हणाले, ‘काश्मीरवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार’

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, 'मला अभिमान आहे की अमेरिका तुम्हाला या ऐतिहासिक आणि शौर्यपूर्ण निर्णयापर्यंत पोहोचण्यास मदत करू शकली...

युद्धबंदीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे आणखी एक विधान; म्हणाले, ‘काश्मीरवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार’
Edited Image

वाशिंग्टन: भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीनंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे विधान केले आहे. काश्मीरचा उल्लेख करताना त्यांनी येथील प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या वादानंतर, डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी युद्धबंदीची माहिती दिली होती. यानंतर, भारत आणि पाकिस्तानकडून एक निवेदन जारी करण्यात आले ज्यामध्ये असे म्हटले गेले की युद्धविरामासाठी भारत-पाकिस्तामध्ये करार झाला आहे.

हेही वाचा – पाकड्यांना पाठीशी घालणाऱ्या चीनवर भारताचा हल्लाबोल

तुमच्या धाडसी कृतींमुळे तुमचा वारसा वाढला – 

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर लिहिले आहे की, ‘भारत आणि पाकिस्तानच्या मजबूत आणि दृढ नेतृत्वाचा मला खूप अभिमान आहे, कारण त्यांच्याकडे सध्याच्या आक्रमकतेला थांबवण्याची वेळ आली आहे हे जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची ताकद, शहाणपण आणि संयम आहे. या युद्धामुळे इतक्या लोकांचा मृत्यू आणि विनाश होऊ शकला असता. लाखो चांगल्या आणि निष्पाप लोकांचा मृत्यू होऊ शकला असता! तुमच्या धाडसी कृतींमुळे तुमचा वारसा खूप वाढला आहे.’

हेही वाचा – ऑपरेशन सिंदूरचं सर्वात मोठं यश; भारतीय हल्ल्यातील टॉप 5 दहशतवादी ठार

काश्मीरबाबत तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करेल – 

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढे म्हटलं आहे की, ‘मला अभिमान आहे की अमेरिका तुम्हाला या ऐतिहासिक आणि शौर्यपूर्ण निर्णयापर्यंत पोहोचण्यास मदत करू शकली. जरी चर्चा झाली नसली तरी, मी या दोन्ही महान राष्ट्रांसोबत व्यापारात लक्षणीय वाढ करणार आहे. याव्यतिरिक्त, हजारो वर्षांनी काश्मीरबाबत तोडगा निघू शकतो का हे पाहण्यासाठी मी तुम्हा दोघांसोबत काम करेन. भारत आणि पाकिस्तानच्या नेतृत्वाला चांगल्या कामासाठी देव आशीर्वाद देवो!!!’ 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number