नागपूर पोलिसांच्यावतीने शहरात सायक्लोथॉनचे आयोजन

महिला सुरक्षा, सांप्रदायिक सौहार्द, तसेच वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्याचा उद्देशाने आज नागपूर शहर पोलिसांचा वतीने शहरात सायक्लोथॉन चे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ६ वाजता आयोजित या सायक्लोथॉन मध्ये विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. या कार्यक्रमात शेकडो पोलीस कर्मचारी, त्यांचे कुटुंब आणि सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले, १२ किलोमीटर च्या सायक्लोथॉन मध्ये शेकडो नागरिकांनी […]

नागपूर पोलिसांच्यावतीने शहरात सायक्लोथॉनचे आयोजन

महिला सुरक्षा, सांप्रदायिक सौहार्द, तसेच वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्याचा उद्देशाने आज नागपूर शहर पोलिसांचा वतीने शहरात सायक्लोथॉन चे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ६ वाजता आयोजित या सायक्लोथॉन मध्ये विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. या कार्यक्रमात शेकडो पोलीस कर्मचारी, त्यांचे कुटुंब आणि सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले, १२ किलोमीटर च्या सायक्लोथॉन मध्ये शेकडो नागरिकांनी सायकल चालवीत जनतेत जनजागृती केली.

शनिवारी लेडीज क्लब चौकातील पोलिस भवनात एक्स्पोचे आय़ोजन करण्यात आले होते. एक्स्पोमध्ये नागरिकांना पोलिसांच्या कामकाजाची माहिती देण्यात आली. यात पोलिस वापरत असलेले अत्याधुनिक शस्त्रांचे प्रदर्शन, बॉम्ब शोधक व नाशक पथक, शीघ्र कृती दल, श्वान पथक, वाहतूक पोलिस, वायरलेस पथक तसेच सायबर सेलच्या कामकाजाची माहिती देण्यात आली. एक्स्पोदरम्यान नागरिक पोलीस बँडच्या सुमधूर संगीताचा आनंद घेतला. अशा आयोजनामुळे पोलिस आणि नागरिकांमधील संबंध मजबूत होणार असून ही पोलिसांना समजून घेण्याची चांगली संधी असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

 

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number