सरकार अस्थिर करणे हे काँग्रेसचे धोरण; पंतप्रधानांनी वाचला काँग्रेसच्या अपयशाचा पाढा

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत काँग्रेसच्या अपयशाचा पाढा वाचून दाखवला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे एकात्मिक रुप गौरवले आहे. तर भारताच्या संघराज्य संकल्पनेचा आम्हाला सर्वाधिक आदर असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. दरम्यान, पंतप्रधानांनी काँग्रेसवर निशाणा साधला. सरकार अस्थिर करणे हे काँग्रेसचे धोरण असल्याची टीका, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. केंद्रामध्ये […]

सरकार अस्थिर करणे हे काँग्रेसचे धोरण; पंतप्रधानांनी वाचला काँग्रेसच्या अपयशाचा पाढा

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत काँग्रेसच्या अपयशाचा पाढा वाचून दाखवला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे एकात्मिक रुप गौरवले आहे. तर भारताच्या संघराज्य संकल्पनेचा आम्हाला सर्वाधिक आदर असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. दरम्यान, पंतप्रधानांनी काँग्रेसवर निशाणा साधला. सरकार अस्थिर करणे हे काँग्रेसचे धोरण असल्याची टीका, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

केंद्रामध्ये काँग्रेस सत्तेत असताना अनेकदा लोकनियुक्त सरकार बरखास्त करण्यात आली. संपूर्ण देश काँग्रेसचे सत्य ओळखून आहे. काँग्रेस काळात बरखास्त करण्यात आलेल्या राज्यांची यादी पंतप्रधानांनी वाचून दाखवली. काँग्रेसच्या काळात गुजरातवर अन्याय झाला आहे. केरळमध्ये नंबुद्रीपाद यांचे सरकार बरखास्त करण्यात आले तर तामिळनाडूमध्ये करुणानिधींचे सरकार पाडण्यात आले. आंध्र प्रदेशमधले एनटीआर सरकार बरखास्त करण्यात आले, अशा पद्धतीने पंतप्रधानांनी काँग्रेसच्या अपयशाचा पाढा वाचला.

भारत ही लोकशाहीची जननी आहे. मात्र लोकशाहीला घराणेशाही घातक आहे. घराणेशाहीनेच देशाचे सर्वाधिक नुकसान केले आहे. त्यामुळे काँग्रेसने याची जबाबदारी घ्यावी, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. काँग्रेसच्या विचारांवर शहरी नक्षलवाद्यांचा पगडा असल्याचेही ते म्हणाले. गोवा भारतीय स्वातंत्र्यानंतरही १५ वर्ष पारतंत्र्यात होता. मात्र, पंडित जवाहरलाल नेहरू यांना गोव्याच्या वेदनेची काळजी नसून ते स्वत:च्या प्रतिमेच्या प्रेमात होते. तसेच सावरकर गीत गायल्याने हृदयनाथ मंगेशकर यांची नोकरी गेली, तर नेहरुंवर टीका केल्यामुळे मजरुह सुल्तानपुरी यांना तुरुंगवास भोगावा लागला, ही आहे काँग्रेसच्या अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याची व्याख्या, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number