हृदयस्पर्शी! एका वडिलांची पोस्ट व्हायरल; ‘हे मुलींचे संगोपन नाहीये, ही तर शांती ठेवून क्रांती आहे…’

बंगळुरूमधील अजित शिवराम नावाच्या या व्यक्तीने लिंक्डइनवर एक भावनिक पोस्ट शेअर केली. यामध्ये त्यांनी मुलींचे संगोपन करणे ही 'लपलेली क्रांती' असल्याचे म्हटले आहे.

हृदयस्पर्शी! एका वडिलांची पोस्ट व्हायरल; ‘हे मुलींचे संगोपन नाहीये, ही तर शांती ठेवून क्रांती आहे…’

बंगळुरू – सध्या सोशल मीडियावर एका वडिलांची स्वतःच्या मुलींविषयीची हृदयस्पर्शी पोस्ट व्हायरल होत आहे. अजित शिवराम असे या पित्याचे नाव आहे. त्यांच्या या पोस्टने लाखो मनांना स्पर्श केला. मुलींना वाढवण्यातील आव्हाने, समाजाची मानसिकता आणि वडिलांच्या भावना त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे मांडल्या. त्यांची पोस्ट केवळ लोकांसाठी भावनिक कथा बनत नाही तर त्यांचे विचार बदलण्याचे साधन देखील बनत आहे.

बंगळुरूमधील अजित शिवराम नावाच्या या व्यक्तीने लिंक्डइनवर एक भावनिक पोस्ट शेअर केली. यामध्ये त्यांनी मुलींचे संगोपन करणे ही 'लपलेली क्रांती' असल्याचे म्हटले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी भारतातील मुलींवरील भेदभाव, समाजाची विचारसरणी आणि स्वतःची बदलती समजूत अतिशय सोप्या आणि प्रभावी शब्दात वर्णन केली आहे. त्यांचे शब्द लाखो लोकांच्या हृदयाला स्पर्शून गेले.

हेही वाचा – 17 डॉक्टर अपयशी, शेवटी AI ने वाचवले 4 वर्षांच्या मुलाचे प्राण! ChatGPT वरून दुर्मीळ आजाराचा लागला पत्ता

प्रत्येक सकाळ एक आव्हान असते
अजित यांनी लिहिलंय की, त्यांच्या मुली दररोज गणवेश घालतात आणि त्यांच्या स्वप्नांसह अशा समाजात जातात, जो त्यांच्यासाठी बनलेला नाही. हे असे जग आहे, जे त्यांच्या हास्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करेल, त्यांच्या स्वप्नांना कमी लेखेल आणि त्यांच्या मौनाला त्यांचे मूल्य मानेल. "मुलींना वाढवणे म्हणजे दररोज नाश्त्यापूर्वी भेदभावाचा सामना करणे,' असे ते म्हणाले.

तुम्हाला मुलगा का झाला नाही?
अजित यांनी सांगितलं की, समाजातील लोक त्यांना वारंवार विचारायचे की, त्यांना मुलगा का नाही? शेजारी त्यांच्या पत्नीशी नृत्य आणि बॅलेबद्दल बोलतात तर, त्यांच्याशी विज्ञान प्रकल्पांबद्दल बोलतात. या छोट्या छोट्या गोष्टी समाजात खोलवर रुजलेल्या लिंग-आधारित विचारसरणीला (म्हणजेच, महिला आणि पुरुष यांच्यातील भेदभाव) उघड करतात.

घरापासून ऑफिसपर्यंत, फरक सर्वत्र दिसून येतो
अजित म्हणतात की, आता जेव्हा ते ऑफिस किंवा क्लायंट मीटिंगला जातात, तेव्हा त्यांना अशा महिला स्पष्ट दिसतात, ज्यांना वारंवार वेगवेगळ्या बाबतीत रोखले जाते. ज्यांच्या आयडीयाज इतरांच्या नावावर घेतल्या जातात आणि त्यांना त्यांच्या चांगल्या कामाचे आणि विचारांचे श्रेय दिले जात नाही. तरीही हे सर्व न मिळताही त्या कठोर परिश्रम करतात. त्यांना हे समजले कारण, त्यांनी त्यांच्या मुलींनाही दररोज या गोष्टींचा सामना करताना पाहिले आहे.

'मी हिरो नाहीये, फक्त एक शिकणारा पिता आहे'
अजित यांनी स्वतःला एक हिरो मानत नाहीत तर, ते स्वतःला एका वडिलांच्या भूमिकेत पाहतात, जो पिता आपल्या मुलींकडून दररोज काहीतरी नवीन शिकतो. त्यांनी लिहिले, "नेतृत्व जेवणाच्या टेबलावर शिकले जाते, मीटींग रूममध्ये नाही, जेव्हा तुम्हाला तुमच्या 7 वर्षांच्या मुलीला समजावून सांगावे लागते की, 'मुली असे करत नाहीत' ही धारणा खोटी आहे."

आज मुलींसाठी जग थोडे तरी चांगले झाले आहे का?
पोस्टच्या शेवटी त्यांनी लिहिले, "दररोज रात्री माझ्या मुली मला विचारतात की, आजचा माझा दिवस कसा होता.. पण त्यांच्या नजरेत प्रश्न आहे – तुम्ही आज आमचे जग अजून थोडे चांगले केले का?"

हेही वाचा – माझ्या पलंगाखाली 'राक्षस' लपलाय.. चिमुकला सांगत होता.. आयाने खाली वाकून पाहिलं तर.. बापरे..

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number