‘सर्व प्रकल्प गुजरातला नेणं, पंतप्रधानांना शोभत नाही’

पुण्यात “व्यंग, वास्तव आणि राजकारण” या विषयावर 18 व्या जागतिक मराठी संमेलनात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रोखठोक मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना, महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये हलवणे त्यांच्या दर्जाला शोभत नसल्याचं वक्तव्य राज ठाकरे यांनी केले आहे. मात्र, आपण महाराष्ट्र जोपसणं गरजेचं […]

‘सर्व प्रकल्प गुजरातला नेणं, पंतप्रधानांना शोभत नाही’

पुण्यात “व्यंग, वास्तव आणि राजकारण” या विषयावर 18 व्या जागतिक मराठी संमेलनात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रोखठोक मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना, महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये हलवणे त्यांच्या दर्जाला शोभत नसल्याचं वक्तव्य राज ठाकरे यांनी केले आहे. मात्र, आपण महाराष्ट्र जोपसणं गरजेचं आहे. प्रत्येकाने या गोष्टीकडे नीट बघणं आवश्यक आहे. आपल्यात इच्छाशक्ती असावी लागते. नवीन उद्योग निर्माण करुन मराठी तरुणांना रोजगार दिला पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे म्हणाले,”महाराष्ट्र हा श्रीमंत आहे, सर्वार्थाने अग्रेसर आहे. जे आहे ते जरी टिकवलं तरी सर्वांपेक्षा महाराष्ट्र पुढे आहे. एक दोन उद्योग बाहेर गेल्यानं फरक पडत नाही मात्र सर्व प्रकल्प गुजरातला नेणं, पंतप्रधानांना शोभत नाही आपण गुजरातचे आहोत, म्हणून गुजरातला प्राधान्य देणे पंतप्रधान नरेंद्र मोदींना शोभत नाही. त्यांनी प्रत्येक राज्याकडे समान बघण्याची गरज आहे,” असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान झाल्यावर मोदींनी पहिली पाच वर्ष उत्तर प्रदेश, झारखंड आणि बिहारकडे लक्ष द्यावं असं मत मी मांडलं होतं. आजही माझं तेच मत आहे. जर त्या माणसाने चांगलं काम केलं त्याचं अभिनंदन करण्याचा मोकळेपणा सुद्धा तुमच्यामध्ये असला पाहिजे. कलम 370 कलम रद्द करणे, राम मंदिराचा प्रश्न मार्गी लागणे या चांगल्या कामाचं मी त्यांचं अभिनंदन सुद्धा केलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number