पवारांचा हल्लाबोल, फडणवीसांचं प्रत्युत्तर

शरद पवार हे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत अनेक मुदयावर भाष्य केलं आहे. शरद पवार यांनी यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांना सत्ताधारी नेत्यांकडून अटकेची धमकी देण्यात येत असल्याच्या मुद्द्यावर शरद पवारांनी शिंदे-फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे. सत्तेत आल्यावर जमिनीवर पाय ठेवून वागायचं असतं,शरद पवारांनी शिंदे-फडणवीसांना सुनावलं त्यावर फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे.’सत्ता हातात […]

पवारांचा हल्लाबोल, फडणवीसांचं प्रत्युत्तर

शरद पवार हे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत अनेक मुदयावर भाष्य केलं आहे. शरद पवार यांनी यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांना सत्ताधारी नेत्यांकडून अटकेची धमकी देण्यात येत असल्याच्या मुद्द्यावर शरद पवारांनी शिंदे-फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे. सत्तेत आल्यावर जमिनीवर पाय ठेवून वागायचं असतं,शरद पवारांनी शिंदे-फडणवीसांना सुनावलं

त्यावर फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे.’सत्ता हातात आल्यानंतर जमिनीवर पाय ठेवून काम करायचं असतं, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला खडेबोल सुनावले होते. त्याला आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांचे नाव न घेता प्रत्युत्तर दिले’.

औरंगाबादेतील अ‌ॅडवांटेज महाराष्ट्र एक्सपो 2023 चा समारोप आज उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी भाषणादरम्यान देवेंद्र फडणवीस म्हणाले, एक्सपोच्या उद्घाटनाच्या वेळी आमच्या विमानात बिघाड झाला होता. त्यामुळे उद्घाटनाला येता आले नाही. मात्र आम्ही केवळ सोय म्हणून विमान वापरतो. आम्ही जमिनीवरच आहोत, जमिनीवरच्या लोकांशी आमचा संबंध आहे, त्यामुळे हवेत कोण आहे त्याची तपासणी त्यांनी करावी असे म्हणत फडणवीसांनी शरद पवारांच्या टीकेला अप्रत्यक्षपणे उत्तर दिले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number