Yuvraj Singh : धोनी ‘व्हिलन’ नाही! युवराज सिंगने अखेर नावंच घेतली; ‘या’ दोघांमुळे करिअर धोक्यात आल्याचा खळबळजनक दावा

अनेक वर्षांपासून चाहत्यांमध्ये अशी चर्चा होती की महेंद्रसिंग धोनीमुळे युवराजचं करिअर संपलं. युवराजने आता या चर्चांवर स्पष्ट भूमिका मांडली आहे.

Yuvraj Singh : धोनी ‘व्हिलन’ नाही! युवराज सिंगने अखेर नावंच घेतली; ‘या’ दोघांमुळे करिअर धोक्यात आल्याचा खळबळजनक दावा

Yuvraj Singh Retirement Controversy : भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा 'मॅच विनर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युवराज सिंगने आपल्या निवृत्तीच्या वळणावरील अनेक गुपितं उघड केली आहेत. अनेक वर्षांपासून चाहत्यांमध्ये अशी चर्चा होती की महेंद्रसिंग धोनीमुळे युवराजचं करिअर संपलं. मात्र, युवराजने आता या चर्चांवर स्पष्ट भूमिका मांडली असून, त्याच्या करिअरच्या अखेरच्या काळात नेमकं काय घडलं, याचा पाढाच वाचला आहे. त्याने स्पष्टपणे सांगितलं की, त्याला धोनीकडून नव्हे, तर संघ व्यवस्थापनातील इतर महत्त्वाच्या व्यक्तींकडून स्पष्टता मिळाली नाही.

कर्णधार आणि प्रशिक्षकावर थेट बोट
युवराजने एका क्रीडा वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तो म्हणाला, "जेव्हा मी माझ्या करिअरच्या अत्यंत कठीण टप्प्यातून जात होतो, तेव्हा मला तत्कालीन कर्णधार विराट कोहली किंवा प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याकडून कोणतीही स्पष्टता मिळाली नाही. मी त्यावेळी 36 वर्षांचा होतो आणि 37 व्या वर्षात पदार्पण करत होतो. नॅशनल क्रिकेट अकॅडमीकडूनही  (NCA) मला माझ्या भविष्याबद्दल काहीच सांगण्यात आलं नव्हतं." युवराजच्या मते, ज्या खेळाडूंनी देशासाठी मोठं योगदान दिलं आहे, त्यांच्याशी संवाद साधणं हे व्यवस्थापनाचं कर्तव्य होतं.

धोनीनेच दिली होती योग्य दिशा
धोनीवर टीका करण्याऐवजी युवराजने त्याचं कौतुक केलं. युवीने सांगितलं की, "मी एमएस धोनीशी फोनवर बोललो होतो. त्याने मला परिस्थितीचा योग्य अँगल दिला. त्याला माझ्याकडून कोणताही फायदा नव्हता, पण संघात काय चाललंय आणि माझ्यासाठी पुढे काय वाढून ठेवलंय, हे तो स्पष्टपणे पाहू शकत होता." युवराजच्या मते, वीरेंद्र सेहवाग, झहीर खान आणि हरभजन सिंग यांसारख्या दिग्गज खेळाडूंनाही अशाच प्रकारच्या संवादाच्या अभावाचा फटका बसला होता. चर्चा कितीही कठीण असली, तरी मोठ्या खेळाडूंना सत्य जाणून घेण्याचा हक्क असतो, असंही त्याने नमूद केलं.

हेही वाचा – Sunil Gavaskar: 'त्याला आधी संघातून बाहेर काढा…'; सुनील गावस्कर 'या' अष्टपैलू खेळाडूवर संतापले

फिटनेस टेस्टचा तो 'टर्निंग पॉईंट'
युवराजच्या करिअरच्या शेवटी त्याला फिटनेस टेस्टचं मोठं आव्हान देण्यात आलं होतं. "मला सांगण्यात आलं होतं की, जर मी फिटनेस टेस्ट पास करू शकलो नाही, तर मी निवृत्तीचा विचार करावा. मी स्पष्ट केलं होतं की माझ्या निवृत्तीचा निर्णय मी स्वतः घेईन. मी ती चाचणी जिद्दीने पास केली, पण त्यानंतरही मला संघात घ्यायचे की नाही, हे पूर्णपणे त्यांच्या हातात होतं. शेवटी मला माझ्या खेळात आनंद मिळणंही बंद झालं होतं," अशी खंत युवराजने व्यक्त केली. फिटनेस सिद्ध करूनही संधी न मिळणं हे त्याच्यासाठी अधिक वेदनादायी होतं.

सन्मानाचा अभाव आणि अनिश्चितता
प्रशिक्षक किंवा निवडकर्त्यांनी खेळाडूंसोबत बसून कटू का होईना पण सत्य बोलायला हवं होतं, असं युवराजचं मत आहे. तो म्हणाला की, "कदाचित ते संभाषण चांगलं झालं नसतं, पण किमान मला स्पष्टता तरी मिळाली असती. किमान एक प्रयत्न तरी केला जायला हवा होता." वयाच्या 36 व्या वर्षी आपण संघात आहोत की नाही, हेच माहीत नसल्याने युवराज गोंधळलेल्या स्थितीत होता. शेवटी, पुरेसा सन्मान आणि पारदर्शकता न मिळाल्याची सल आजही त्याच्या बोलण्यातून स्पष्टपणे जाणवतो.

हेही वाचा – IPL 2026 Orange Cap: काही तासांतच गेम पलटला! रिझवीच्या तुफानी खेळीने रोहितकडून हिसकावली ऑरेंज कॅप

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number