Yastika Bhatia: क्रिकेटच्या पंढरीवर यस्तिका भाटियाने रचला इतिहास; लॉर्ड्सवर ‘हा’ विक्रम करणारी ठरली पहिली महिला फलंदाज

इंग्लंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात भारताची यष्टीरक्षक-फलंदाज यस्तिका भाटियाने शानदार शतकी खेळी साकारत इतिहास रचला.

Yastika Bhatia: क्रिकेटच्या पंढरीवर यस्तिका भाटियाने रचला इतिहास; लॉर्ड्सवर ‘हा’ विक्रम करणारी ठरली पहिली महिला फलंदाज

Yastika Bhatia: भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासात 'क्रिकेटची पंढरी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर एका सुवर्ण अध्यायाची नोंद झाली आहे. इंग्लंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात भारताची यष्टीरक्षक-फलंदाज यस्तिका भाटियाने शानदार शतकी खेळी साकारत इतिहास रचला. लॉर्ड्सच्या मैदानावर महिला कसोटी क्रिकेटमध्ये शतक ठोकणारी ती जगातील पहिलीच फलंदाज ठरली आहे. या 25 वर्षीय खेळाडूने सामन्याच्या 3 र्‍या दिवशी अवघ्या 145 चेंडूंमध्ये आपले हे ऐतिहासिक शतक पूर्ण केले. तिच्या या खेळीत 12 देखण्या चौकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे, हे तिच्या कसोटी कारकिर्दीतील आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलेच शतक ठरले आहे.

पहिल्याच चेंडूवर नशिबाची साथ आणि झुंजार खेळी
लॉर्ड्स कसोटीच्या 3 र्‍या दिवशी फलंदाजीला आलेल्या यस्तिकाला सुरुवातीलाच नशिबाची मोठी साथ मिळाली. इंग्लंडची वेगवान गोलंदाज लॉरेन बेल हिने टाकलेला दिवसातील पहिलाच चेंडू यस्तिकाच्या ऑफ-स्टंपला जाऊन धडकला, मात्र सुदैवाने बेल्स खाली न पडल्यामुळे ती बाद होण्यापासून थोडक्यात वाचली. या मिळालेल्या जीवदानाचा पूर्ण फायदा उठवत यस्तिकाने अत्यंत संयमपूर्ण आणि तंत्रशुद्ध फलंदाजीचे प्रदर्शन केले. लॉर्ड्सच्या मैदानावर खेळली जाणारी ही इतिहासातील पहिलीच महिला कसोटी असून यस्तिकाच्या या शतकाने हा सामना अधिकच संस्मरणीय बनवला आहे.

क्रांती गौरनंतर 'ऑनर्स बोर्ड'वर नाव कोरणारी दुसरी भारतीय खेळाडू
या ऐतिहासिक सामन्यात यापूर्वीच भारताची वेगवान गोलंदाज क्रांती गौर हिने इंग्लंडच्या पहिल्या डावात 5 बळी घेत लॉर्ड्सच्या प्रतिष्ठित 'ऑनर्स बोर्ड'वर (सन्मान फलकावर) आपले नाव कोरले होते. त्यानंतर आता यस्तिका भाटियानेही शतकी खेळी करत हा बहुमान पटकावला आहे. सलग दोन दिवसांत दोन भारतीय महिला खेळाडूंनी लॉर्ड्सच्या 'ऑनर्स बोर्ड'वर स्थान मिळवणे ही भारतीय महिला क्रिकेटच्या दृष्टीने अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक कामगिरी मानली जात आहे.

हेही वाचा – Team Indian Squad: इंग्लंड आणि झिम्बाब्वे दौऱ्यापूर्वी भारतीय संघात मोठे बदल; दुखापतीमुळे 2 स्टार खेळाडू बाहेर, 'या' नव्या चेहऱ्यांना संधी

भारताची स्थिती मजबूत; यस्तिका 113 धावांवर बाद
भारतीय संघाला मोठ्या धावसंख्येचा टप्पा ओलांडून देण्याची जबाबदारी खांद्यावर असताना यस्तिकाने संयम आणि आक्रमकता यांचा सुरेख मेळ घालत इंग्लंडच्या गोलंदाजांचा यशस्वी सामना केला. अखेरीस ती 158 चेंडूंमध्ये 14 चौकारांच्या मदतीने 113 धावांची खेळी करून बाद झाली. भारतीय डावाच्या 73 व्या षटकात सोफी एक्लेस्टोनने यस्तिकाला बाद केले, जे तिचे या डावातील 4 थे बळी ठरले. यस्तिका बाद झाली तेव्हा संघाची धावसंख्या 287 धावा होती. दरम्यान, भारतीय संघाने आपल्या दुसऱ्या डावात 300 हून अधिक धावा उभारल्या असून त्यांची एकूण आघाडी आता 400 धावांच्या पार गेली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number