World Athletics Championships 2025: भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवत जपानमध्ये सुरू असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पात्रता फेरीत पहिल्याच प्रयत्नात त्याने 84.85 मीटरचा थ्रो करत फायनलमध्ये स्थान निश्चित केले.
हेही वाचा – IND vs AUS: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला दुसरी वनडे : मंधानाची दमदार खेळी, भारताची स्थिर सुरुवात
नीरज चोप्रा सध्या या स्पर्धेचा गतविजेता आहे. 2023 मध्ये बुडापेस्टमध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्याने सुवर्णपदक जिंकले होते. आता पुन्हा एकदा तो अंतिम फेरीत आपले जेतेपद राखण्यास सज्ज आहे. ही त्याची सलग पाचवी जागतिक स्पर्धा असून, पात्रतेसाठी त्याला फक्त एका थ्रोची गरज भासली.
Defending champion Neeraj Chopra makes it into the Men's Javelin Throw Final with a throw of 84.85m ?#IndiainWCHTokyo #IndianAthletics #WCHTokyo25 #AFI pic.twitter.com/NiNGhwwpp8 — Athletics Federation of India (@afiindia) September 17, 2025
दरम्यान, जर्मनीच्या ज्युलियन वेबरने 87.21 मीटरचा थ्रो दुसऱ्या प्रयत्नात करत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. तथापी, आता नीरज आणि पाकिस्तानचा अर्शद नदीम यांच्यातील लढत पुन्हा एकदा रंगणार आहे. 2024 पॅरिस ऑलिंपिकमध्ये नदीमने 92.97 मीटरच्या विक्रमी थ्रोसह सुवर्णपदक जिंकले होते, तर नीरजने 89.45 मीटरच्या थ्रोवर रौप्यपदक पटकावले होते. त्यामुळे आगामी अंतिम फेरीत नीरजला आपला ऑलिंपिक पराभवाचा बदला घेण्याची मोठी संधी मिळणार आहे.