IND vs PAK : भारतीय महिला संघ 5 ऑक्टोबरला पाकिस्तानसोबत भिडणार; BCCI ने दिला ‘हा’ खास आदेश

आता टीम इंडिया रविवारी, 5 ऑक्टोबरला आपल्या मोहिमेतील दुसरा सामना पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. मात्र, या सामन्याआधीच बीसीसीआयने महिला क्रिकेट संघाला काही महत्त्वाचे आदेश दिले आहेत.

IND vs PAK : भारतीय महिला संघ 5 ऑक्टोबरला पाकिस्तानसोबत भिडणार; BCCI ने दिला ‘हा’ खास आदेश

IND vs PAK : आयसीसी वूमन्स वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत भारतीय महिला संघाने हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेवर 30 सप्टेंबर रोजी 59 धावांनी विजय मिळवत दमदार सुरुवात केली. आता टीम इंडिया रविवारी, 5 ऑक्टोबरला आपल्या मोहिमेतील दुसरा सामना पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. मात्र, या सामन्याआधीच बीसीसीआयने महिला क्रिकेट संघाला काही महत्त्वाचे आदेश दिले आहेत.

बीसीसीआयच्या सूत्रांनुसार, टीम इंडियाला पाकिस्तानच्या खेळाडूंसह सामन्याच्या टॉस दरम्यान तसेच सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्याचे निर्देश दिले आहेत. ही भूमिका गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या मेन्स टी20 आशिया कप 2025 स्पर्धेतून प्रेरित आहे. या स्पर्धेत भारत-पाकिस्तान दोन्ही संघ तीन वेळा आमनेसामने आले होते, आणि प्रत्येक वेळी भारतीय संघाने पाकिस्तानसोबत हस्तांदोलन टाळले होते. आता महिला संघालाही तेच आदेश पालन करण्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा – Indian T20 Team: ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय टी-20 संघ जाहीर; दुखापतीमुळे हार्दिक पंड्या बाहेर

कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होणाऱ्या सामन्याआधी टीम इंडियाला हा आदेश देण्यात आला असून बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की संघाच्या प्रत्येक खेळाडूच्या पाठीशी संघटनेचा पाठिंबा असेल. भारतीय संघाची ही भूमिका पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंधित संतापामुळे अधिक ठाम झाली आहे. काही महिन्यांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला होता. यात अनेक पर्यटकांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा – ODI Captain: बीसीसीआय रोहित शर्माला वनडे कर्णधारपदावरून हटवणार; शुभमन गिलकडे देण्यात येणार संघाचे नेतृत्व

दरम्यान, क्रीडा मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की बहुराष्ट्रीय स्पर्धेत भारताला पाकिस्तानविरुद्ध खेळण्यापासून रोखता येणार नाही. त्यामुळे भारतीय खेळाडूंनी आपल्या रागाची झलक सामन्यादरम्यानही दाखवण्याचे ठरवले आहे. त्यामुळे 5 ऑक्टोबरच्या सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडू पाकिस्तानसोबत हस्तांदोलन करतील की नाही, हे संपूर्ण क्रिकेट विश्वासाठी लक्षवेधी ठरणार आहे. भारताच्या महिला संघाची रणनीती आणि बीसीसीआयची स्पष्ट भूमिका सामन्याआधीच चर्चेचा विषय बनली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number