WPL 2026 Schedule: महिला प्रीमियर लीग (WPL) 2026 बाबत मोठी अपडेट समोर आली आहे. चौथ्या हंगामाचा मेगा लिलाव दिल्लीमध्ये सुरू असताना, पुढील हंगामाची अधिकृत सुरुवात तारीख आणि स्थळांची घोषणा करण्यात आली आहे. WPL चा 2026 हंगाम 9 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2026 दरम्यान पार पडणार आहे. महिला प्रीमियर लीगचे आधीच 3 हंगाम झाले आहेत आणि चौथ्या हंगामाचा लिलाव आज दिल्लीमध्ये सुरू आहे. या मेगा लिलावात 73 जागांसाठी एकूण 277 खेळाडू बोलीसाठी असतील, ज्यात 194 भारतीय आणि 83 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. या लिलावापूर्वी, WPL 2026 ची सुरुवात तारीख जाहीर करण्यात आली आहे.
दोन शहरांमध्ये रंगणार WPL 2026
आगामी हंगाम दोन क्रिकेट मैदानांवर खेळवला जाणार आहे. WPL 2026 चा पहिला सामना नवी मुंबई क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल, तर अंतिम सामना बडोदा क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल. ही माहिती महिला प्रीमियर लीगच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, एक्स वर देण्यात आली आहे.
हेही वाचा – Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जचा मोठा निर्णय! स्मृती मानधनाचे लग्न पुढे ढकलल्यानंतर WBBL मधून माघार
मुंबईने दोनदा जिंकले आहे विजेतेपद
दरम्यान, 2026 च्या WPL हंगामात एकूण 5 संघ भाग घेणार आहेत. यामध्ये दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, मुंबई इंडियन्स, आरसीबी आणि यूपी वॉरियर्स यांचा समावेश आहे. महिला प्रीमियर लीगचे आतापर्यंत 3 हंगाम झाले आहेत, ज्यामध्ये हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबईने दोनदा विजेतेपद जिंकले आहे. स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली आरसीबीने एकदा ट्रॉफी जिंकली आहे.
? NEWS ? The #TATAWPL 2026 will be held from 9th January to 5th February in Navi Mumbai and Vadodara ? The DY Patil Stadium in Navi Mumbai will host the opener.
The BCA Stadium in Vadodara will host the final. ?️#TATAWPLAuction pic.twitter.com/11L5ioLQxN — Women's Premier League (WPL) (@wplt20) November 27, 2025
हेही वाचा – IND vs SA: ‘चांगलं खेळलो नाही, पण…’; टीम इंडियाच्या निराशाजनक कामगिरीनंतर ऋषभ पंतने शेअर केली भावनिक पोस्ट
तथापी, दिल्ली कॅपिटल्सने तीनही WPL हंगामात (2023, 2024 आणि 2025) अंतिम फेरीत प्रवेश केला होता, परंतु तिन्ही वेळा पराभव पत्करावा लागला. त्यांना मुंबईकडून दोनदा आणि आरसीबीकडून एकदा पराभव पत्करावा लागला, ज्यामुळे त्यांचे जेतेपदाचे स्वप्न भंग झाले. 2026 च्या WPL लिलावात, 73 स्लॉटसाठी 277 खेळाडू बोलीसाठी असतील. प्रत्येक संघ किमान 15 खेळाडूंना कायम ठेवू शकेल. त्याच वेळी, एका संघात जास्तीत जास्त 18 खेळाडू असतील.