WPL 2026 Match Time: हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना भिडणार; ‘या’ तारखेपासून रंगणार महिला प्रीमियर लीगचा थरार

या स्पर्धेचा बिगुल 9 जानेवारी रोजी वाजणार असून, सलामीच्या सामन्यात भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गज कर्णधार आमनेसामने येणार आहेत.

WPL 2026 Match Time: हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना भिडणार; ‘या’ तारखेपासून रंगणार महिला प्रीमियर लीगचा थरार

WPL 2026 Match Time: क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महिला प्रीमियर लीगचा (WPL) आगामी 4 था हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या स्पर्धेचा बिगुल 9 जानेवारी रोजी वाजणार असून, सलामीच्या सामन्यात भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गज कर्णधार आमनेसामने येणार आहेत. मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची (RCB) कर्णधार स्मृती मानधना यांच्यातील ही लढत स्पर्धेची रंगत वाढवणारी ठरेल.

सलामीचा सामना आणि वेळापत्रक

WPL 2026 चा प्रारंभ 9 जानेवारी रोजी होईल आणि ही स्पर्धा 5 फेब्रुवारीपर्यंत चालेल. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यात हाय-व्होल्टेज सामना रंगणार आहे. हे सामने कधी सुरू होणार, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. नियमानुसार, संध्याकाळचे सामने रात्री 7:30 वाजता सुरू होतील, ज्यासाठी टॉस 7:00 वाजता होईल. ज्या दिवशी दोन सामने असतील, त्या दिवशी दुपारचा सामना दुपारी 3:30 वाजता सुरू होईल आणि टॉस दुपारी 3:00 वाजता होईल.

हेही वाचा – Vaibhav Suryavanshi: दुहेरी जबाबदारी…दुहेरी धमाका ! कर्णधार वैभव सूर्यवंशीच्या शतकी खेळीने दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत पराभव

दिवस आणि रात्रीच्या सामन्यांचे नियोजन

9 जानेवारी (शुक्रवार): रात्री 7:30 वाजता सलामीचा सामना.
दुसऱ्या दिवशी (शनिवार): या दिवशी दोन सामने खेळवले जातील. पहिला सामना दुपारी 3:30 वाजता, तर दुसरा सामना रात्री 7:30 वाजता सुरू होईल.
रविवार: रविवारी केवळ एकच सामना असेल, जो रात्री 7:30 वाजता खेळला जाईल. भारतीय संघासाठी एकत्र खेळणाऱ्या हरमनप्रीत आणि स्मृती आता आपापल्या फ्रेंचायझीला विजय मिळवून देण्यासाठी एकमेकींसमोर उभ्या ठाकतील.

हेही वाचा – Arjun Tendulkar Wedding: तेंडुलकरांच्या घरी वाजणार सनई-चौघडे; 'या' दिवशी अर्जुन तेंडुलकर अडकणार लग्नबंधनात

जेतेपदाचा इतिहास आणि चुरस

आतापर्यंत पार पडलेल्या तीन हंगामांमध्ये मुंबई इंडियन्स आणि आरसीबीने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. 2023 मधील पहिला हंगाम हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने जिंकला होता. 2024 मध्ये स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली आरसीबीने जेतेपदावर नाव कोरले, तर 2025 मध्ये पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सने बाजी मारत चॅम्पियन ठरण्याचा मान मिळवला. आता 2026 च्या या हंगामात मुंबई आपले वर्चस्व कायम राखते की आरसीबी पुन्हा एकदा ट्रॉफी जिंकते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number