Women’s Kabaddi World Cup 2025: भारताचा जागतिक स्तरावर डंका! महिला कबड्डी संघाने जिंकला विश्वचषक

गेल्या 30 दिवसांत देशाच्या मुलींनी तब्बल तीन विश्वचषक जिंकत भारताचा झेंडा जागतिक क्रीडा मंचावर उंचावला आहे.

Women’s Kabaddi World Cup 2025: भारताचा जागतिक स्तरावर डंका! महिला कबड्डी संघाने जिंकला विश्वचषक

Women's Kabaddi World Cup 2025: भारतातील महिला खेळाडूंनी पुन्हा भारताचे नाव जागतिक पातळीवर कोरले आहे. गेल्या 30 दिवसांत देशाच्या मुलींनी तब्बल तीन विश्वचषक जिंकत भारताचा झेंडा जागतिक क्रीडा मंचावर उंचावला आहे. ताज्या यशात महिला कबड्डी संघाने 2025 च्या विश्वचषकावर दुसऱ्यांदा सलग नाव कोरलं आहे.

ढाका येथे रोमांचक अंतिम सामना

बांगलादेशच्या ढाकामध्ये झालेल्या महिला कबड्डी विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने चायनीज तैपेईचा 35-28 असा पराभव केला. सुरुवातीला तैपेईच्या चुरशीच्या बचावाने भारताला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र शिस्तबद्ध टॅकलिंग, परफेक्ट रेड्स आणि निर्णयक्षम खेळामुळे भारताने सामना हळूहळू आपल्या नियंत्रणात घेतला. पहिल्या हाफमध्ये तैपेईने दिलेल्या आव्हानाला भारतीय संघाने संयमाने तोंड दिले. दुसऱ्या हाफमध्ये भारताने निर्णायक आघाडी घेतली आणि अखेर विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. महिला कबड्डी विश्वचषकाच्या या आवृत्तीत एकूण 11 देशांनी भाग घेतला.  

हेही वाचा – IND vs SA: 46 वर्षांनंतर भारतात अद्भुत कामगिरी; वेगवान गोलंदाज मार्को जॅन्सेनने मोडला 'हा' पराक्रम

30 दिवसांत जिंकले 3 विश्वचषक 

भारतीय मुलींच्या अविश्वसनीय कामगिरीमुळे भारत क्रीडा विश्वात सातत्याने चर्चेत आहे. गेल्या 30 दिवसांत भारताने 3 विश्वचषक जिंकले आहेत. प्रथम, भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेला हरवून महिला विश्वचषक जिंकला. त्यानंतर, भारतीय महिला क्रिकेट संघाने अंध महिला टी20 विश्वचषकात असाधारण कामगिरी केली. त्यांनी अंतिम सामन्यात नेपाळला 7 विकेट्सने हरवले आणि कोलंबोमध्ये अंध महिला टी20 विश्वचषक जिंकला. अंध महिला टी20 विश्वचषक आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यानंतर, आता भारतीय महिला कबड्डी संघाने विश्वचषकही आपल्या नावावर केला आहे. 

हेही वाचा –  Smriti Mandhana’s Father Health Update: स्मृती मानधनाच्या वडिलांच्या प्रकृतीबाबत महत्वाची माहिती समोर; आता तब्येत कशी आहे?

भारतीय महिला खेळाडूंपासून प्रेरणा

क्रीडा क्षेत्रात भारतीय महिला संघांनी दाखवलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे भारताचा क्रीडा आत्मविश्वास उंचावला आहे. विविध खेळांमध्ये जागतिक स्तरावरील यशामुळे महिला खेळाडू देशातील उदयोन्मुख क्रीडापटूंना प्रेरणा देत आहेत.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number