Asian Games 2026: अफगाणिस्तान मालिकेपाठोपाठ वैभव सूर्यवंशी आशियाई क्रीडा स्पर्धेलाही मुकणार? गौतम गंभीर यांनी दिली महत्त्वाची माहिती

सामन्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना गौतम गंभीर म्हणाले, वैभवसाठी हे अगदी स्पष्ट आहे की त्याला आपल्या संधीची प्रतीक्षा करावी लागेल.

Asian Games 2026: अफगाणिस्तान मालिकेपाठोपाठ वैभव सूर्यवंशी आशियाई क्रीडा स्पर्धेलाही मुकणार? गौतम गंभीर यांनी दिली महत्त्वाची माहिती

Asian Games 2026: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका भारताने 3-0 अशा फरकाने जिंकून यश मिळवले आहे. मात्र, या संपूर्ण मालिकेत युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीचा 'प्लेइंग इलेव्हन'मध्ये समावेश न केल्यामुळे क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती. अनेक माजी खेळाडूंनी आणि दिग्गजांनी या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले होते. या सर्व चर्चांवर आता भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी मौन सोडले असून स्पष्ट केले आहे की, आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी या युवा खेळाडूला आपल्या संधीची वाट पाहावीच लागेल.

संधीची वाट पाहावीच लागेल; गौतम गंभीर यांचे स्पष्टीकरण

सामन्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना गौतम गंभीर म्हणाले, "वैभवसाठी हे अगदी स्पष्ट आहे की त्याला आपल्या संधीची प्रतीक्षा करावी लागेल. त्याच्याकडे किती प्रतिभा आहे आणि तो मैदानावर काय करू शकतो, याची संपूर्ण संघ व्यवस्थापनाला पूर्ण कल्पना आहे." गंभीर यांनी पुढे स्पष्ट केले की, ज्या खेळाडूने अनेक वर्षांपासून भारतीय संघासाठी सातत्याने चांगली कामगिरी केली आहे, त्याला नव्याने संघात आलेल्या खेळाडूपेक्षा नेहमीच प्राधान्य दिले जाईल. एकदा का वैभवला संधी मिळाली आणि त्याने ती सिद्ध केली, तर त्याला पुढेही नक्कीच संधी मिळत राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

वय महत्त्वाचे नाही, स्पर्धा आवश्यक 

खेळाडूच्या वयाबाबत बोलताना गंभीर म्हणाले, "खेळाडू 15 वर्षांचा असो किंवा 30 वर्षांचा, त्याला संघात स्थान मिळवण्यासाठी वाट पाहावीच लागते. ड्रेसिंग रूममध्ये स्पर्धा आणि दर्जेदार खेळाडू असणे हेच भारतीय क्रिकेटचे खरे वैशिष्ट्य आहे." भारताच्या 'UK' दौऱ्यादरम्यान संजू सॅमसनला सलग 3 सामन्यांत अपयश आल्यानंतर वैभव सूर्यवंशीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. मात्र, पहिल्या 3 सामन्यांत त्याला अपेक्षित छाप पाडता आली नाही आणि त्यानंतर त्याला अंतिम 11 खेळाडूंच्या संघातून बाहेर राहावे लागले.

हेही वाचा – Asian Games: मनू भाकर आणि तजिंदरपाल सिंग तूर भारताचे ध्वजवाहक; आशियाई खेळांच्या उद्घाटन सोहळ्यासाठी अधिकृत निवड

आशियाई क्रीडा स्पर्धेतही खेळण्याची शक्यता कमी

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात वैभव सूर्यवंशीचा समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेत व्हीव्हीएस लक्ष्मण प्रशिक्षक असणार आहेत, तर श्रेयस अय्यर संघाचे नेतृत्व करणार आहे. मात्र, मुख्य प्रशिक्षकांच्या भूमिकेमुळे आणि अनुभवी खेळाडूंच्या उपस्थितीमुळे आशियाई क्रीडा स्पर्धेतही वैभवला 'प्लेइंग इलेव्हन'मध्ये थेट संधी मिळण्याची शक्यता अत्यंत कमी मानली जात आहे. त्यामुळे वैभवला आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्हे आहेत.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number