IPL 2026 : माहीच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी; धोनी IPL 2026 मध्ये खेळणार का?, CSK च्या सीईओंनी केलं स्पष्ट

फ्रँचायझीचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी धोनीच्या पुढील हंगामातील सहभागाबाबत मोठा खुलासा करत, सर्व अटकळांना पूर्णविराम दिला आहे.

IPL 2026 : माहीच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी; धोनी IPL 2026 मध्ये खेळणार का?, CSK च्या सीईओंनी केलं स्पष्ट

Will Dhoni Play IPL 2026: चेन्नई सुपर किंग्जच्या (CSK) चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) पुन्हा एकदा आयपीएलच्या मैदानावर उतरू शकतो. फ्रँचायझीचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी धोनीच्या पुढील हंगामातील सहभागाबाबत मोठा खुलासा करत, सर्व अटकळांना पूर्णविराम दिला आहे. कासी विश्वनाथन यांनी सांगितले, 'धोनीने आम्हाला वैयक्तिकरित्या कळवले आहे की तो पुढील आयपीएल हंगामासाठी उपलब्ध असेल. या वक्तव्यानंतर सीएसकेच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे.  

धोनीने मागील हंगामात पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व केले होते. सीएसकेची कामगिरी गेल्या वर्षी अपेक्षेइतकी झाली नव्हती, तरीही संघाचा आत्मविश्वास टिकवण्यात धोनीने मोलाची भूमिका बजावली. 44 वर्षीय धोनीने आतापर्यंत 248 सामने खेळले आहेत आणि 4,865 धावा करत संघाला 5 आयपीएल विजेतेपदे (2010, 2011, 2018, 2021, 2023) मिळवून दिली आहेत. जर तो 2026 मध्ये खेळला, तर हा त्याचा CSK साठी 17 वा हंगाम असेल.

हेही वाचा –  Maharashtra Women Cricketers : विश्वचषकविजेत्या महिला खेळाडूंचा गौरव; स्मृती, जेमिमा आणि राधाला सरकारनं दिलं 'इतक्या' कोटींचं बक्षीस

फ्रँचायझी सूत्रांच्या मते, हा धोनीचा शेवटचा आयपीएल हंगाम ठरू शकतो. चाहत्यांसमोर स्टायलिश निरोप घेण्याची त्याची इच्छा असल्याची चर्चा आहे. त्यामुळे 2026 चा आयपीएल हंगाम धोनीसाठी “फेअरवेल सीझन” ठरू शकतो.

हेही वाचा – Pratika Rawal: जय शाह यांचा हस्तक्षेप निर्णायक; प्रतीका रावलला मिळालं तिचं हक्काचं विश्वचषक मेडल

CSKची नवी रणनीती 

चेन्नई सुपर किंग्जचा संघ आता पुढील हंगामासाठी आपली रणनीती ठरवत आहे. 10 आणि 11 नोव्हेंबर रोजी धोनी, सीईओ विश्वनाथन, कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांच्या महत्त्वाच्या बैठकीचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. या बैठकीत रिटेन्शन आणि ट्रेड संबंधी महत्त्वाचे निर्णय होणार आहेत. राजस्थान रॉयल्स आणि सीएसके यांच्यात या संभाव्य करारावर गुप्त चर्चेला सुरुवात झाली आहे. आगामी काही दिवसांत यावर अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number