Asian Games 2026: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघ मोहसिन नक्वी यांच्याकडून पदकं स्वीकारणार का? BCCI ने सोडलं मौन; नियम काय सांगतो?

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) प्रमुख मोहसिन नक्वी आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेला उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Asian Games 2026: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघ मोहसिन नक्वी यांच्याकडून पदकं स्वीकारणार का? BCCI ने सोडलं मौन; नियम काय सांगतो?

Asian Games 2026: आशिया चषकादरम्यान सुरु झालेला ट्रॉफी स्वीकारण्याबाबतचा वाद आता आशियाई क्रीडा स्पर्धेतही निर्माण होण्याची शक्यता आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) प्रमुख मोहसिन नक्वी आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेला उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या वर्षी आशिया चषक जिंकल्यानंतर भारतीय पुरुष क्रिकेट संघाने मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारली नव्हती. तसेच, नुकत्याच झालेल्या महिला आशिया चषक विजयानंतर भारतीय महिला संघानेही नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी घेण्यास स्पष्ट नकार दिला होता. पाकिस्तानचे विद्यमान गृहमंत्री असलेल्या नक्वी यांच्या हस्ते पदकांचे वितरण झाल्यास भारतीय खेळाडूंची भूमिका काय असेल, याविषयी राजकीय व क्रीडा वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

जपानमधील आशियाई क्रीडा स्पर्धेत नक्वी उपस्थित राहण्याची शक्यता

वृत्तानुसार, ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ आशिया (OCA) मोहसिन नक्वी यांना पदक वितरण समारंभासाठी आमंत्रित करू शकते. जपानमधील आइची-नागोया येथे होणाऱ्या 2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पदके प्रदान करण्याची जबाबदारी जर नक्वी यांच्यावर सोपवण्यात आली, तर भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट संघाला त्यांच्याकडून पदके स्वीकारावी लागतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

काय सांगतात 'OCA'चे अधिकृत नियम?

'टाइम्स ऑफ इंडिया'च्या (TOI) वृत्तानुसार आणि भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनमधील (IOA) वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, OCA च्या घटनेतील कलम 66 नुसार पदक वितरण समारंभाचे अधिकार OCA अध्यक्षांकडे असतात. OCA चे अध्यक्ष कतारचे शेख जोआन बिन हमद अल-थानी जर ही जबाबदारी अधिकृतपणे नक्वी यांच्यावर सोपवतील, तर भारतीय खेळाडूंना त्यांच्याकडून पदके स्वीकारणे बंधनकारक ठरेल. पदक स्वीकारण्यास नकार दिल्यास तो OCA आणि क्रीडा स्पर्धेचा अवमान मानला जाईल, ज्यामुळे खेळाडूंवर कडक शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. तसेच या नियमांनुसार पदक वितरण समारंभात कोणत्याही राजकीय किंवा धार्मिक निदर्शनांना सक्त मनाई आहे.

हेही वाचा – Asian Games 2026 : आशियाई क्रीडा स्पर्धेत मोठा बदल; अनुभवी कबड्डीपटू पवन सेहरावत बनले भारताचे नवीन ध्वजवाहक

BCCI ची सावध भूमिका; योग्य वेळी निर्णयाचे संकेत

या संपूर्ण प्रकरणावर 'बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया'च्या (BCCI) भूमिकेविषयी विचारले असता, बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी स्पष्ट केले की, "सध्या आमचे सर्व लक्ष केवळ सामन्यांवर आणि संघाने पोडियमपर्यंत पोहोचण्यावर केंद्रित आहे. जी घटना अजून घडलेलीच नाही, त्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही. योग्य वेळ आल्यावर परिस्थितीनुसार अंतिम निर्णय घेतला जाईल."

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number