Vladimir Putin India Visit: पुतिन यांच्या भारत भेटीदरम्यान होणार मोठा संरक्षण करार? भारताच्या शत्रू देशांच वाढलं टेन्शन

16 ते 21 नोव्हेंबरदरम्यान पार पडलेल्या दुबई एअर शोमध्ये रशियाच्या रोसोबोरॉन एक्सपोर्ट कंपनीने भारतात Su-57 चे उत्पादन करण्याची तयारी व्यक्त केली.

Vladimir Putin India Visit: पुतिन यांच्या भारत भेटीदरम्यान होणार मोठा संरक्षण करार? भारताच्या शत्रू देशांच वाढलं टेन्शन

Vladimir Putin India Visit: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आगामी भारत भेटीपूर्वी दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्याबाबत महत्त्वपूर्ण संकेत मिळत आहेत. विशेषतः रशियाच्या Su-57 या पाचव्या पिढीतील स्टेल्थ लढाऊ विमानाबाबत भारत निर्णय घेऊ शकतो का? याबाबत चर्चा अधिकच तीव्र झाली आहे. 16 ते 21 नोव्हेंबरदरम्यान पार पडलेल्या दुबई एअर शोमध्ये रशियाच्या रोसोबोरॉन एक्सपोर्ट कंपनीने भारतात Su-57 चे उत्पादन करण्याची तयारी व्यक्त केली. हा प्रस्ताव सलग दुसऱ्या वर्षी भारताला मिळाल्याने संरक्षण विश्लेषकांचे लक्ष या घडामोडींवर केंद्रीत झाले आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला बेंगळुरूमध्ये झालेल्या एअरो इंडिया-2024 मध्ये कंपनीने Su-57 साठी तंत्रज्ञान हस्तांतरणाची ऑफर दिली होती. त्यानंतर भारत एक किंवा दोन स्क्वॉड्रन खरेदी करण्याचा किंवा मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्याचा पर्याय तपासत आहे. भारताचे स्वदेशी पाचव्या पिढीतील स्टेल्थ लढाऊ विमान एएमसीए 2035-36 पर्यंत सेवेत येईल, असा एडीएचा अंदाज आहे. हवाई दलासमोरील शक्तीसंतुलनाची पोकळी भरून काढण्यासाठी भारताला पुढील दहा वर्षे परदेशी स्टेल्थ फायटरवर अवलंबून राहावे लागू शकते. चीनने आधीच दोन प्रकारची पाचव्या पिढीतील विमाने J-20 आणि J-35 तैनात केली आहेत. त्यापैकी J-35 पाकिस्तानला देण्याची बीजिंगची तयारी असल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत भारताचे हवाई सामर्थ्य वाढवणे अत्यावश्यक ठरत आहे. लष्करी तज्ञांच्या मते, भारताकडे दोन पर्याय आहेत. रशियाचे Su-57 किंवा अमेरिकेचे F-35, ज्यांची विक्री करण्याची ऑफर डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती.

हेही वाचा – Donald Trump: अमेरिकेत व्हाइट हाऊसजवळील हल्ल्यानंतर ट्रम्प प्रशासनाची भूमिका; इमिग्रेशन धोरण अधिक कठोर करण्याची तयारी

Su-57 vs F-35; कोण अधिक घातक? 

Su-57 आणि F-35 ही दोन्ही अत्यंत धोकादायक आणि प्राणघातक पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने आहेत. सुखोई-57 ही विमाने रशियाने 2024 मध्ये बनवली होती. F-35 गेल्या दशकापासून अमेरिकन हवाई दलाचा भाग आहे. तथापि, अलिकडच्या काही महिन्यांत झालेल्या अपघातांमुळे F-35 वादात सापडले आहे. तथापी, Su-57 आणि F-35 या दोन्ही विमानांनी युद्धभूमीवर आपले कौशल्य सिद्ध केले आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला करण्यासाठी Su-57 चा वापर केला आहे, तर अमेरिका आणि इस्रायलने इराणविरुद्धच्या हल्ल्यांमध्ये F-35 लढाऊ विमानांचा यशस्वीपणे वापर केला आहे. F-35 हे सिंगल-इंजिन लढाऊ विमान आहे, तर Su-57 हे ट्विन-इंजिन विमान आहे.

हेही वाचा – Australian PM Wedding : 62 वर्षीय ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांचा अजब रेकॉर्ड, कारण ऐकून तुम्ही व्हाल थक्क

भारत-रशिया डिफेन्स डीलवर जगाचे लक्ष

दरम्यान, पुतिन यांच्या भेटीत Su-57 संदर्भातील चर्चेला गती मिळण्याची शक्यता आहे. चीन-पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे आणि भारताच्या कमी होत चाललेल्या फायटर स्क्वॉड्रनमुळे हा करार सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. भारत पुढील दशकासाठी हवाई दलाचे बळकटीकरण कसे करतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number