Ishan Kishan Girlfriend: इशान किशनसोबत दिसणारी ‘ती’ मिस्ट्री गर्ल कोण? विजयानंतरच्या रोमँटिक फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण

या ऐतिहासिक विजयानंतर मैदानावर खेळाडूंच्या सेलिब्रेशनचे अनेक फोटो समोर आले, पण यामध्ये भारतीय फलंदाज इशान किशन आणि एका 'मिस्ट्री गर्ल'चा फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे.<br/>

Ishan Kishan Girlfriend: इशान किशनसोबत दिसणारी ‘ती’ मिस्ट्री गर्ल कोण? विजयानंतरच्या रोमँटिक फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Ishan Kishan Girlfriend: भारताने 2026 चा टी-20 वर्ल्ड कप जिंकून क्रिकेट विश्वात नवा इतिहास रचला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर न्यूझीलंडला 96 धावांनी धूळ चारत टीम इंडियाने तिसऱ्यांदा विश्वविजेतेपदावर नाव कोरले. या ऐतिहासिक विजयानंतर मैदानावर खेळाडूंच्या सेलिब्रेशनचे अनेक फोटो समोर आले, पण यामध्ये भारतीय फलंदाज इशान किशन आणि एका ‘मिस्ट्री गर्ल’चा फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे.

कोण आहे ही अदिती हुंडिया?
इशान किशनसोबत दिसणारी ही तरुणी दुसरी कोणी नसून त्याची कथित प्रेयसी अदिती हुंडिया आहे. अदिती ही राजस्थानमधील जयपूरची रहिवासी असून ती एक प्रसिद्ध फॅशन मॉडेल आणि उद्योजक आहे. 2017 मध्ये ती ‘फेमिना मिस इंडिया’ची फायनलिस्ट होती, तर 2018 मध्ये तिने ‘मिस दिवा सुपरनॅशनल’ हा किताब जिंकून नाव कमावले होते. इशान आणि अदितीच्या नात्याची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून क्रिकेट वर्तुळात रंगत असते. आयपीएल दरम्यानही ती अनेकदा इशानला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित असते.

इशानच्या आजोबांनी दिली ‘पसंती’ची पावती
इशान किशनचे आजोबा अनुराग पांडे यांनी भारताच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त करतानाच अदितीबद्दलही सूचक विधान केले आहे. ते म्हणाले, “मी सामन्यानंतर अदितीला इशानला भेटताना पाहिले. इशानने तिच्याशी लग्न करावे असे आम्हाला वाटते आणि आमचा या नात्याला स्वीकार आहे. अदिती प्रत्येक सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जाते.” आजोबांच्या या विधानामुळे इशान आणि अदिती लवकरच विवाहबंधनात अडकणार का? अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत.

हेही वाचा – Hardik Pandya-Mahika: विश्वविजेतेपदाच्या जल्लोषादरम्यान हार्दिक-माहिकाचं प्रेम बहरलं; मैदानावरील ‘रोमँटिक’ क्षणांची सोशल मीडियावर चर्चा

फायनलमध्ये इशानची वादळी खेळी
केवळ मैदानाबाहेरील चर्चाच नव्हे, तर मैदानावरील कामगिरीतही इशानने सर्वांची मने जिंकली. भारताने प्रथम फलंदाजी करताना 255 धावांचा डोंगर उभा केला, ज्यामध्ये इशान किशनने अवघ्या 25 चेंडूत 54 धावांची स्फोटक खेळी केली. फलंदाजीसोबतच त्याने यष्टीमागे 3 कठीण झेल घेत विजयात मोलाचे योगदान दिले. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांच्या अर्धशतकांमुळे भारताला न्यूझीलंडसमोर मोठे लक्ष्य ठेवता आले, ज्याचा पाठलाग करताना किवींचा संघ 159 धावांवर गारद झाला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number