Team India: टी-20 वर्ल्ड कप विजयानंतर टीम इंडिया मैदानात कधी परतणार? पुढच्या सामन्याची तारीख आली समोर

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताने मिळवलेल्या या दैदीप्यमान विजयानंतर आता चाहत्यांना वेध लागले आहेत ते टीम इंडियाच्या पुढच्या टी-20 सामन्याचे.

Team India: टी-20 वर्ल्ड कप विजयानंतर टीम इंडिया मैदानात कधी परतणार? पुढच्या सामन्याची तारीख आली समोर

Team India: टी-20 विश्वचषक 2026 मध्ये न्यूझीलंडचा पराभव करून ऐतिहासिक जेतेपद पटकावल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ सध्या विश्रांतीवर आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताने मिळवलेल्या या दैदीप्यमान विजयानंतर आता चाहत्यांना वेध लागले आहेत ते टीम इंडियाच्या पुढच्या टी-20 सामन्याचे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली विश्वविजेता बनलेला भारतीय संघ आता थेट जुलै महिन्यात आपला पुढचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

IPL नंतर अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी आणि वनडे मालिका
टी-20 विश्वचषकाचा थरार संपल्यानंतर आता भारतीय खेळाडू 28 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल (IPL 2026) मध्ये दिसणार आहेत. आयपीएलचा अंतिम सामना 31 मे रोजी होण्याची शक्यता आहे. यानंतर, जून महिन्यात अफगाणिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. मात्र, या दौऱ्यात केवळ एक कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे, विश्वचषकानंतर टी-20 फॉरमॅटमध्ये भारतीय संघ या मालिकेत दिसणार नाही.

इंग्लंड दौऱ्यावर रंगणार टी-20 चा थरार
भारतीय संघ जुलै महिन्यात इंग्लंडच्या प्रदीर्घ दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात पाच टी-20 आंतरराष्ट्रीय आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाईल. विश्वविजेता बनल्यानंतर टीम इंडियाचा हा पहिलाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामना असेल. या मालिकेतील पहिला टी-20 सामना 1 जुलै रोजी खेळला जाणार असून, ही मालिका 11 जुलैपर्यंत चालेल. आयपीएलनंतर खेळाडूंना विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळणार असल्याने, टीम इंडिया पूर्ण ताकदीनिशी इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरेल.

हेही वाचा – T20 World Cup 2026 Hardik Pandya : फायनल दरम्यानचं सेलिब्रेशन हार्दिक पांड्याच्या अंगाशी; एका कृत्यावरुन थेट FIR दाखल

वनडे विश्वचषकावर असेल सर्वांचे लक्ष
इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेनंतर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका पार पडणार आहे. विशेष म्हणजे, पुढच्या वर्षी एकदिवसीय विश्वचषक (ODI World Cup) आयोजित केला जाणार आहे. त्यामुळे, या दौऱ्यापासून भारतीय संघाचे मुख्य लक्ष टी-20 ऐवजी पुन्हा एकदा एकदिवसीय क्रिकेटवर केंद्रित होणार आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर टीम इंडियाचे पुढील टी-20 वेळापत्रक अद्याप निश्चित झालेले नाही, त्यामुळे जुलै महिन्यातील ही मालिका चाहत्यांसाठी विशेष आकर्षण ठरेल.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number