ODI Series: वेस्ट इंडिजच्या न्यूझीलंड दौऱ्यासाठी एकदिवसीय संघ जाहीर; ‘हा’ खेळाडू तब्बल सहा वर्षांनी संघात परतला

आता संघ 16 नोव्हेंबरपासून यजमान न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे.

ODI Series: वेस्ट इंडिजच्या न्यूझीलंड दौऱ्यासाठी एकदिवसीय संघ जाहीर; ‘हा’ खेळाडू तब्बल सहा वर्षांनी संघात परतला

ODI Series: वेस्ट इंडिजचा न्यूझीलंड दौरा टी-20 मालिकेत पराभवाने सुरू झाला. पाच सामन्यांच्या मालिकेत त्यांना 3-1 असा पराभव पत्करावा लागला. आता संघ 16 नोव्हेंबरपासून यजमान न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. क्रिकेट वेस्ट इंडिजने संघ जाहीर केला असून, यामध्ये सहा वर्षांनंतर सलामीवीर फलंदाज जॉन कॅम्पबेलचे पुनरागमन करण्यात आले आहे. ही एकदिवसीय मालिका वेस्ट इंडिजसाठी महत्त्वाची आहे, कारण त्यांनी या फॉरमॅटमध्ये मागील काही काळात अपेक्षेनुसार कामगिरी दाखवलेली नाही. मालिकेचा पहिला सामना क्राइस्टचर्चमधील हेग्ली ओव्हल येथे होईल.

जॉन कॅम्पबेलसोबत जोहान लायन आणि श्मार स्प्रिंगर यांनीही एकदिवसीय पदार्पण केले आहे. खांद्याच्या दुखापतीतून परतलेला वेगवान गोलंदाज मॅथ्यू फोर्डला देखील संघात स्थान देण्यात आले आहे. त्याचबरोबर, अकिल होसेन, गुडाकेश मोती आणि रॅमन सिमंड्स यांची जागा ही तिन्ही नवीन खेळाडूंनी घेतली आहे. बांगलादेशविरुद्धच्या मागील मालिकेत सहभागी झालेल्या अल्झारी जोसेफ, शमार जोसेफ आणि जेडिया ब्लेड्स या खेळाडू दुखापतीमुळे या मालिकेत दिसणार नाहीत.

हेही वाचा – MCA Election 2025 Result : MCA निवडणुकीचा निकाल जाहीर; जितेंद्र आव्हाड उपाध्यक्ष, तर मिलिंद नार्वेकरांची कार्यकारिणी सदस्यपदी वर्णी

ब्रँडन किंगच्या खराब कामगिरीमुळे जॉन कॅम्पबेलला संघात स्थान मिळाले आहे. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत दुसऱ्या सामन्यात कॅम्पबेलने शानदार शतक झळकावले, तर सुपर50 कपच्या गेल्या हंगामात सात डावांमध्ये 278 धावा करून तो जमैकाचा आघाडीचा फलंदाज ठरला.

हेही वाचा – IPL 2026: चिन्नास्वामी वादानंतर RCB चं होम ग्राउंड पुण्यात? महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा मोठा दावा

न्यूझीलंडविरुद्धची वेस्ट इंडिज एकदिवसीय संघ:

साई होप (कर्णधार), अ‍ॅलिक अथानासे, अहकीम ऑगस्टे, जॉन कॅम्पबेल, केसी कार्टी, रोस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, जस्टिन ग्रीव्हज, अमीर जांगू, जोहान लेन, खारी पियरे, शेरफेन रदरफोर्ड, जेडेन सील्स, रोमारियो शेफर्ड, शमार स्प्रिंगर.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number