Hasaranga Out of IPL: वानिंदू हसरंगा IPL मधून बाहेर; लखनौ संघ लवकरच बदली खेळाडूची करणार घोषणा

श्रीलंकेचा स्टार लेगस्पिनर वानिंदू हसरंगा दुखापतीमुळे आयपीएल 2026 मधून बाहेर पडला आहे. संघाचे क्रिकेट संचालक टॉम मूडी यांनी गुरुवारी कोलकाता येथे ही माहिती दिली.

Hasaranga Out of IPL: वानिंदू हसरंगा IPL मधून बाहेर; लखनौ संघ लवकरच बदली खेळाडूची करणार घोषणा

Hasaranga Out of IPL: लखनौ सुपर जायंट्स (LSG) संघाला मोठा धक्का बसला असून श्रीलंकेचा स्टार लेगस्पिनर वानिंदू हसरंगा दुखापतीमुळे आयपीएल 2026 मधून बाहेर पडला आहे. संघाचे क्रिकेट संचालक टॉम मूडी यांनी गुरुवारी कोलकाता येथे ही माहिती दिली. मूडी यांनी स्पष्ट केले की, हसरंगाच्या जागी बदली खेळाडू घेण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील 24 ते 48 तासांत त्याच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाईल. हसरंगाच्या अनुपस्थितीमुळे लखनौच्या फिरकी आक्रमणात बदल करणे भाग पडले आहे.

जॉर्ज लिंडेच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
ईएसपीएनक्रिकइन्फोला मिळालेल्या माहितीनुसार, हसरंगाची जागा भरून काढण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा फिरकी गोलंदाज जॉर्ज लिंडे याला संघात घेण्याची दाट शक्यता आहे. लिंडे अद्याप आयपीएलमध्ये खेळलेला नाही, मात्र जगभरातील विविध टी20 लीगमध्ये त्याने आपला प्रभाव पाडला आहे. त्याने 250 टी20 सामन्यांमध्ये 7.42 च्या इकॉनॉमी रेटने 218 बळी घेतले आहेत. त्याचा अनुभव लखनौसाठी फायदेशीर ठरू शकतो.

दुखापत आणि एनओसीची अडचण
फेब्रुवारीमध्ये टी20 विश्वचषकादरम्यान श्रीलंकेच्या सलामीच्या सामन्यात हसरंगाच्या डाव्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली होती, तेव्हापासून तो मैदानाबाहेर आहे. आयपीएलमध्ये सामील होण्यासाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडून (SLC) ना हरकत प्रमाणपत्र (NOC) मिळवणे आवश्यक होते, मात्र अनिवार्य फिटनेस चाचण्या न दिल्याने त्याला हे प्रमाणपत्र मिळाले नाही. लखनौने गेल्या लिलावात हसरंगाला 2 कोटी रुपयांना विकत घेतले होते, परंतु आता तो संपूर्ण हंगामाला मुकणार आहे.

हेही वाचा – IPL 2026 Young Achievers : यंदाच्या IPL मध्ये हे अनकॅप्ड खेळाडू करू शकतात चमकदार कामगिरी, देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले कोण आहेत हे खेळाडू ? जाणून घ्या

लखनौची गोलंदाजीची सद्यस्थिती
हसरंगाच्या अनुपस्थितीनंतरही लखनौ सुपर जायंट्सने या हंगामात आतापर्यंत प्रभावी गोलंदाजी केली आहे. त्यांच्या ताफ्यात सध्या शहबाज अहमद, दिग्वेश राठी आणि एम. सिद्धार्थ यांसारखे फिरकीपटू आहेत. दरम्यान, वेगवान गोलंदाज मोहसिन खान हा देखील प्रकृतीच्या कारणास्तव पहिल्या सामन्यानंतर मैदानाबाहेर आहे. परंतु, आता मोहसिनच्या पुनरागमनाकडेही चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number