Vaibhav Suryavanshi : क्रिकेट विश्वात भारताच्या लेकाचा डंका ! 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीचा ‘या’ पुरस्काराने गौरव

आपल्या स्फोटक फलंदाजीने जागतिक क्रिकेटमध्ये खळबळ माजवून देणाऱ्या वैभवला आज देशातील सर्वोच्च बाल सन्मान म्हणजेच 'पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारा'ने गौरवण्यात आले.<br/>

Vaibhav Suryavanshi : क्रिकेट विश्वात भारताच्या लेकाचा डंका ! 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीचा ‘या’ पुरस्काराने गौरव

Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar 2025 :  कर्तृत्वाला वयाचे बंधन नसते हे बिहारच्या अवघ्या 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी याने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. आपल्या स्फोटक फलंदाजीने जागतिक क्रिकेटमध्ये खळबळ माजवून देणाऱ्या वैभवला आज देशातील सर्वोच्च बाल सन्मान म्हणजेच 'पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारा'ने गौरवण्यात आले.

राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान, पंतप्रधानांची घेतली भेट

नवी दिल्ली येथे आयोजित एका भव्य सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वैभवला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. क्रीडा क्षेत्रातील त्याच्या अभूतपूर्व कामगिरीची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. पुरस्कार स्वीकारल्यानंतर वैभवसह इतर विजेत्या बालकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवादही साधला. विशेष म्हणजे, या महत्त्वाच्या सोहळ्यासाठी दिल्लीत उपस्थित असल्याने वैभवला विजय हजारे ट्रॉफीमधील बिहारच्या दुसऱ्या फेरीच्या सामन्याला मुकावे लागले.

हेही वाचा – Powerlifter Sukhvir Singh: क्षणभरात सगळं संपलं; 350 किलो डेडलिफ्टनंतर प्रसिद्ध पॉवरलिफ्टरचा मैदानातच मृत्यू

विक्रमी कामगिरीचा धडाका

वैभवला हा पुरस्कार त्याच्या सातत्यपूर्ण आणि विक्रमी खेळासाठी देण्यात आला आहे. विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मध्ये त्याने क्रिकेट विश्वाला थक्क करणारी कामगिरी केली. अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यात त्याने अवघ्या 36 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने 84 चेंडूत 190  धावांची तुफानी खेळी केली, ज्यात 16 चौकार आणि 15 षटकारांचा समावेश होता. लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सर्वात तरुण वयात शतक ठोकण्याचा आणि सर्वात जलद 150 धावा करण्याचा जागतिक विक्रम आता वैभवच्या नावावर आहे. याच सामन्यात बिहारने 574 धावांचा डोंगर उभा केला, जो एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम ठरला.

हेही वाचा –  Vijay Hazare Trophy 2025: विजय हजारे ट्रॉफीमध्ये विराट कोहलीची तुफान खेळी; सचिन तेंडुलकरचा 'हा' विक्रम काढला मोडीत

राष्ट्रीय बाल पुरस्कार का दिला जातो?

हा देशातील 5 ते 18 वयोगटातील मुलांसाठी असलेला अत्यंत प्रतिष्ठित सन्मान आहे. साहस, क्रीडा, विज्ञान, समाजसेवा आणि कला-संस्कृती यांसारख्या क्षेत्रांत असाधारण कामगिरी करणाऱ्या बालकांना हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारात पदक, रोख पारितोषिक, प्रमाणपत्र आणि बुक व्हाउचर समाविष्ट आहे. तथापी, विजेत्यांना प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होण्याची आणि दिल्लीला भेट देण्याची संधी देखील मिळते. हा पुरस्कार उदयोन्मुख प्रतिभेला राष्ट्रीय प्रोत्साहन आणि मान्यता प्रदान करतो. वैभव सूर्यवंशीच्या या यशामुळे बिहारसह संपूर्ण देशातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number