Donald Trump On epstein Files : एपस्टीन प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांचे वादग्रस्त फोटो समोर, अखेर सोडलं मौन, म्हणाले, ”मी त्याला आधीच..’

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या 'ट्रुथ सोशल' या प्लॅटफॉर्मवर ख्रिसमसच्या निमित्ताने एक लांबलचक पोस्ट शेअर केली. या प्रकरणात पुढे आणखी नावे समोर येतील, असा इशाराही त्यांनी दिला.

Donald Trump On epstein Files :  एपस्टीन प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांचे वादग्रस्त फोटो समोर, अखेर सोडलं मौन, म्हणाले, ”मी त्याला आधीच..’

Donald Trump on Jeffrey Epstein Link: अमेरिकेतील लैंगिक गुन्ह्यातील आरोपी जेफ्री एपस्टीन प्रकरणाने संपूर्ण जगात खळबळ उडाली असताना, आता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. न्याय विभागाने प्रसिद्ध केलेल्या नवीन कागदपत्रांमध्ये ट्रम्प यांच्या नावाचा उल्लेख आल्यानंतर विरोधकांनी त्यांना लक्ष्य केले होते, त्याला आता ट्रम्प यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

सोशल मीडियावरून विरोधकांचा समाचार
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या 'ट्रुथ सोशल' या प्लॅटफॉर्मवर ख्रिसमसच्या निमित्ताने एक लांबलचक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी टीकाकारांवर निशाणा साधताना म्हटले की, "ज्या लोकांनी जेफ्री एपस्टीनच्या पार्ट्यांचा आनंद घेतला, त्याच्या खासगी बेटावर फेऱ्या मारल्या आणि त्याला जगातील सर्वात महान माणूस मानले, आज तेच लोक माझ्यावर बोट दाखवत आहेत. जेव्हा परिस्थिती बिघडली, तेव्हा या लोकांनी त्याला कुत्र्यासारखे सोडून दिले." ट्रम्प यांनी अशा लोकांना 'गलीच्छ मानसिकतेचे' (Sleazebags) असे संबोधले आहे.

एपस्टीनशी असलेल्या संबंधांवर स्पष्टीकरण
जेफ्री एपस्टीन हा एक घृणास्पद व्यक्ती होता आणि त्याच्याशी आपला काहीही संबंध नसल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. "तो जगाच्या नजरेत फॅशनेबल होण्यापूर्वीच मी त्याच्याशी असलेले सर्व संबंध तोडले होते. त्याला लांब करणारा मी एकमेव व्यक्ती आहे," असे ट्रम्प यांनी ठामपणे सांगितले. माध्यमांमधील चुकीच्या वार्तांकनावर संताप व्यक्त करताना त्यांनी इशारा दिला की, हे लोक खोट्या बातम्यांना अधिक महत्त्व देत आहेत.

हेही वाचा – Jeffrey Epstein Files Big Bang : एपस्टीन फाईल्सचा स्फोट! डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अत्याचाराचे भयंकर आरोप; खळबळजनक खुलासे

विमान प्रवासाचे दावे आणि न्याय विभागाची भूमिका
न्यायालयातील काही कागदपत्रांनुसार, ट्रम्प यांनी 1993 ते 1996 दरम्यान किमान 8 वेळा एपस्टीनच्या खासगी विमानाने प्रवास केल्याचा उल्लेख आहे. मात्र, ट्रम्प यांच्यावर कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारी सहभागाचा आरोप झालेला नाही. या वादाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या न्याय विभागाने (DOJ) सोशल मीडियावर एक महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. सुमारे 30,000 नवीन कागदपत्रे प्रसिद्ध केल्यानंतर, न्याय विभागाने स्पष्ट केले की 2020 च्या निवडणुकीपूर्वी ट्रम्प यांच्याबद्दल करण्यात आलेले दावे खोटे आणि निराधार होते.

डेमोक्रॅट्सवर उलटवार
या प्रकरणाचा वापर करून राजकारण करणाऱ्यांना इशारा देताना ट्रम्प म्हणाले की, येणाऱ्या काळात या तपासात अनेक 'डेमोक्रॅट' नेत्यांची नावे समोर येतील. तेव्हा या लोकांना जगाला बरेच स्पष्टीकरण द्यावे लागेल. ट्रम्प यांच्या या विधानामुळे अमेरिकेतील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा – Canada : छातीत असह्य वेदना, आठ तास ताटकळत ठेवलं! 'बाबा, आता मला वेदना सहन होत नाहीत' म्हणत लेकाने सोडले प्राण

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number