Japan Open Super 750: 2 वर्षांचा दुष्काळ संपला! अकाने यामागुचीला धूळ चारीत सिंधू बनली जपान ओपनची ‘क्वीन’

पी.व्ही. सिंधूने जपान ओपन सुपर-750 स्पर्धेच्या जेतेपदावर आपले नाव कोरत एक नवा इतिहास रचला आहे. अंतिम लढतीत तिने यजमान जपानच्या अकाने यामागुचीला सरळ गेम्समध्ये 21-17, 21-17 असे पराभूत केले.

Japan Open Super 750: 2 वर्षांचा दुष्काळ संपला! अकाने यामागुचीला धूळ चारीत सिंधू बनली जपान ओपनची ‘क्वीन’

Japan Open Super 750: भारतीय बॅडमिंटन जगतातील दिग्गज खेळाडू पी.व्ही. सिंधूने जपान ओपन सुपर-750 स्पर्धेच्या जेतेपदावर आपले नाव कोरत एक नवा इतिहास रचला आहे. अंतिम लढतीत तिने यजमान जपानच्या अकाने यामागुचीला सरळ गेम्समध्ये 21-17, 21-17 असे पराभूत केले. या देदिप्यमान विजयासह ही मानाची स्पर्धा जिंकणारी ती भारतातील पहिली महिला बॅडमिंटनपटू ठरली आहे. सिंधूसाठी हा विजय अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण जवळपास 2 वर्षांच्या प्रदीर्घ अंतरानंतर ती एखाद्या मोठ्या 'BWF वर्ल्ड टूर' स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली होती. यापूर्वी तिने 2024 मध्ये झालेल्या 'सैयद मोदी इंटरनॅशनल' स्पर्धेत विजेतेपद मिळवले होते.

रोमांचक फायनल आणि जेतेपदाचा प्रवास

अंतिम सामन्यात सिंधूने सुरुवातीपासूनच अत्यंत आक्रमक आणि कौशल्याधारित खेळ केला. पहिल्या गेममध्ये ती एका टप्प्यावर 9-11 अशी मागे पडली होती, मात्र त्यानंतर तिने अप्रतिम पुनरागमन करत पहिला गेम 21-17 ने खिशात टाकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधूने यामागुचीला डोके वर काढण्याची कोणतीही संधी दिली नाही. जपानी खेळाडूने सामन्यात परतण्याचे जोरदार प्रयत्न केले, परंतु सिंधूच्या सातत्यपूर्ण आक्रमणापुढे तिची डाळ शिजली नाही. अखेर हा गेमही 21-17 असा जिंकून सिंधूने अवघ्या 50 मिनिटांत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

हेही वाचा – FIFA World Cup 2026: फिफाचा ऐतिहासिक निर्णय; विजेत्यांना मिळणार 'चॅम्पियनशिप रिंग्ज'; तुम्ही देखील करू शकता खरेदी

उपांत्य फेरीतील आव्हान आणि आशियाई खेळांसाठी सज्जता

या स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात सिंधूचा सामना चीनच्या बलाढ्य ऑलिम्पिक विजेत्या चेन युफेईशी झाला होता. या चुरशीच्या सामन्यात सिंधूने पहिला गेम 21-19 असा जिंकला होता, तर दुसऱ्या गेममध्ये ती 15-10 अशी आघाडीवर असताना चेन युफेईला हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे सामन्यातून माघार घ्यावी लागली. त्याआधी उपांत्यपूर्व फेरीतही सिंधूला प्रतिस्पर्धी खेळाडूकडून 'वॉकओव्हर' मिळाला होता. या खणखणीत जेतेपदामुळे सिंधूच्या जागतिक क्रमवारीत मोठी झेप तर होईलच, शिवाय 2026 मधील आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक जिंकण्याच्या तिच्या आशाही कमालीच्या उंचावल्या आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number