IND vs SA: भारतासाठी सर्वात वाईट दिवस! ‘या’ 5 खेळाडूंनी कापलं टीम इंडियाचं नाक

दक्षिण आफ्रिकेने 408 धावांनी विजय मिळवत भारताचा कसोटी इतिहासातील धावांनी सर्वात मोठा पराभव नोंदवला. या धक्कादायक पराभवात भारतीय संघातील पाच खेळाडूंनी अत्यंत निराशाजनक कामगिरी करत मोठी निराशा दिली.<br/>

IND vs SA: भारतासाठी सर्वात वाईट दिवस! ‘या’ 5 खेळाडूंनी कापलं टीम इंडियाचं नाक

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला 2-0 अशी लाजिरवाणी क्लीन स्वीप हार पत्करावी लागली. गुवाहाटी कसोटीत दक्षिण आफ्रिकेने 408 धावांनी विजय मिळवत भारताचा कसोटी इतिहासातील धावांनी सर्वात मोठा पराभव नोंदवला. या धक्कादायक पराभवात भारतीय संघातील पाच खेळाडूंनी अत्यंत निराशाजनक कामगिरी करत मोठी निराशा दिली.

साई सुदर्शन  

भारतीय कसोटी संघातील सर्वात महत्त्वाच्या स्थानावर खेळताना साई सुदर्शन सातत्याने अपयशी ठरला. त्याने पहिल्या डावात 15 आणि दुसऱ्या डावात 14 धावांची निराशाजनक कामगिरी केली.

ऋषभ पंत 

कर्णधार ऋषभ पंतची कामगिरी सर्वात निराशाजनक ठरली. पहिल्या डावात तो येताच त्याने त्याची विकेट फेकून दिली. गोलंदाजांना खेळपट्टीने फारशी मदत केली नाही, पण तरीही पंतने क्रीजमधून बाहेर पडताना मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आणि तो बाद झाला.

ध्रुव जुरेल  

आफ्रिका A विरुद्ध चांगली कामगिरी केल्यानंतर त्याला गिलच्या जागी संधी मिळाली. परंतु पहिल्या डावात शून्य आणि दुसऱ्या डावात केवळ 2 धावा करून तो फारशी चमक दाखवू शकला नाही.

हेही वाचा – India vs South Africa: भारताचा लाजिरवाणा पराभव! दक्षिण आफ्रिकेचा धावांचा डोंगर पार करू शकली नाही टीम इंडिया

केएल राहुल 

संघातील सर्वात अनुभवी खेळाडू असूनही राहुलने दोन्ही डावांत निराशा केली. पहिल्या डावात 22 आणि दुसऱ्या डावात फक्त 6 धावांची खेळी करून तो अपयशी ठरला.

नितीश कुमार रेड्डी 

अष्टपैलू म्हणून संधी मिळालेल्या नितीश कुमार रेड्डीने पहिल्या डावात 10 धावा केल्या तर दुसऱ्या डावात शून्यावर बाद झाला. गोलंदाज म्हणूनही 10 षटके टाकून कोणतीही विकेट घेऊ शकला नाही. 

हेही वाचा – Basketball Player Tragic Death : दुर्दैवी! राष्ट्रीय पातळीवरील अल्पवयीन बास्केटबॉलपटूचा छातीवर पोल कोसळून मृत्यू; Viral Video समोर

दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आफ्रिकन संघाने प्रभावी कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेने तब्बल 25 वर्षांनी कसोटी सामन्यात विजय मिळवला. या सामन्यात भारताला 408 धावांनी दणदणीत पराभव पत्कारावा लागला. टीम इंडियाच्या या पराभवामुळे आजचा दिवस क्रिकेटप्रेमींसाठी अत्यंत वाईट आणि निराशाजनक ठरला आहे.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number