IPL 2026 Schedule: आयपीएलच्या आगामी हंगामाची (IPL 2026) प्रतीक्षा आता संपली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयपीएल 2026 च्या पहिल्या टप्प्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. यंदाच्या हंगामाचा सलामीचा सामना 28 मार्च 2026 रोजी खेळला जाईल. विशेष म्हणजे, यंदा पहिल्या शनिवारी आणि रविवारी कोणताही ‘डबलहेडर’ (एकाच दिवशी दोन सामने) नसेल, तर दिवसाचे दोन सामने खेळण्याची सुरुवात 4 एप्रिलपासून होणार आहे.
बंगळुरूमध्ये रंगणार सलामीचा सामना
यंदाच्या आयपीएलचा पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात रंगणार आहे. हा सामना 28 मार्च रोजी बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल. दुसऱ्या दिवशी, 29 मार्च रोजी मुंबई इंडियन्सचा (MI) सामना घरच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सशी (KKR) होईल. सध्या केवळ 12 एप्रिल पर्यंतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, आगामी विधानसभा निवडणुकांच्या तारखा लक्षात घेऊन उर्वरित टप्प्याचे नियोजन केले जाईल.
डबलहेडर्सचा थरार 4 एप्रिलपासून
हंगामातील पहिला डबलहेडर सामना 4 एप्रिल रोजी खेळला जाईल. दुपारी 3:00 वाजता दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आणि संध्याकाळी 7:00 वाजता गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स अशा दोन लढती होतील. क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे 12 एप्रिल रोजी देखील दोन हाय-व्होल्टेज सामने होणार आहेत, ज्यात संध्याकाळी मुंबई इंडियन्स आणि आरसीबी हे दोन दिग्गज संघ आमनेसामने येतील.
? News ? Presenting the schedule for the first 20 matches of #TATAIPL 2026, to be played from March 28 to April 12, 2026 ?️ Full schedule will be announced once poll dates are announced for three states set to undergo State Assembly elections. More details ▶️… pic.twitter.com/8Iq492v8TE — IndianPremierLeague (@IPL) March 11, 2026
हेही वाचा – ICC Prize Money: विजेत्या टीम इंडियावर कोट्यवधींचा वर्षाव! ICC कडून बक्षीस रकमेची घोषणा
आयपीएल 2026 च्या पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक –
चेन्नई सुपर किंग्स (CSK)
30 मार्च 2026 (सोमवार): RR विरुद्ध CSK: गुवाहाटी
3 एप्रिल 2026 (शुक्रवार): CSK विरुद्ध PBKS: चेन्नई
5 एप्रिल 2026 (रविवार): RCB विरुद्ध CSK: बेंगळुरू
11 एप्रिल 2026 (शनिवार): CSK विरुद्ध DC: चेन्नई
मुंबई इंडियन्स (MI)
29 मार्च 2026 (रविवार): MI विरुद्ध KKR: मुंबई
4 एप्रिल 2026 (शनिवार): DC विरुद्ध MI: दिल्ली
7 एप्रिल 2026 (मंगळवार): RR विरुद्ध MI: गुवाहाटी
12 एप्रिल 2026 (रविवार): MI विरुद्ध RCB: मुंबई
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)
28 मार्च 2026 (शनिवार): RCB विरुद्ध SRH: बेंगळुरू
5 एप्रिल 2026 (रविवार): RCB विरुद्ध CSK: बेंगळुरू
10 एप्रिल 2026 (शुक्रवार): RR विरुद्ध RCB: गुवाहाटी
12 एप्रिल 2026 (रविवार): MI विरुद्ध RCB: मुंबई
कोलकाता नाईट रायडर्स (KKR)
29 मार्च 2026 (रविवार): MI विरुद्ध KKR: मुंबई
2 एप्रिल 2026 (गुरुवार): KKR विरुद्ध SRH: कोलकाता
6 एप्रिल 2026 (सोमवार): KKR विरुद्ध PBKS: कोलकाता
9 एप्रिल 2026 (गुरुवार): KKR विरुद्ध LSG: कोलकाता
राजस्थान रॉयल्स (RR)
30 मार्च 2026 (सोमवार): RR विरुद्ध CSK: गुवाहाटी
4 एप्रिल 2026 (शनिवार): GT विरुद्ध RR: अहमदाबाद
7 एप्रिल 2026 (मंगळवार): RR विरुद्ध MI: गुवाहाटी
10 एप्रिल 2026 (शुक्रवार): RR विरुद्ध RCB: गुवाहाटी
गुजरात टायटन्स (GT)
31 मार्च 2026 (मंगळवार): PBKS विरुद्ध GT: मुल्लानपूर
4 एप्रिल 2026 (शनिवार): GT विरुद्ध RR: अहमदाबाद
8 एप्रिल 2026 (बुधवार): DC विरुद्ध GT: दिल्ली
12 एप्रिल 2026 (रविवार): LSG विरुद्ध GT: लखनऊ
सनरायझर्स हैदराबाद (SRH)
28 मार्च 2026 (शनिवार): RCB विरुद्ध SRH: बेंगळुरू
2 एप्रिल 2026 (गुरुवार): KKR विरुद्ध SRH: कोलकाता
5 एप्रिल 2026 (रविवार): SRH विरुद्ध LSG: हैदराबाद
11 एप्रिल 2026 (शनिवार): PBKS विरुद्ध SRH: मुल्लानपूर
दिल्ली कॅपिटल्स (DC)
1 एप्रिल 2026 (बुधवार): LSG विरुद्ध DC: लखनऊ
4 एप्रिल 2026 (शनिवार): DC विरुद्ध MI: दिल्ली
8 एप्रिल 2026 (बुधवार): DC विरुद्ध GT: दिल्ली
11 एप्रिल 2026 (शनिवार): CSK विरुद्ध DC: चेन्नई
लखनऊ सुपर जायंट्स (LSG)
1 एप्रिल 2026 (बुधवार): LSG विरुद्ध DC: लखनऊ
5 एप्रिल 2026 (रविवार): SRH विरुद्ध LSG: हैदराबाद
9 एप्रिल 2026 (गुरुवार): KKR विरुद्ध LSG: कोलकाता
12 एप्रिल 2026 (रविवार): LSG विरुद्ध GT: लखनऊ
पंजाब किंग्ज (PBKS)