ILT20 2025-26 Live Streaming: आंतरराष्ट्रीय लीग T20 (ILT20) चा 2025-26 हंगाम आज, 2 डिसेंबरपासून UAE मध्ये सुरू होत असून क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. फक्त दहा महिन्यांच्या अंतराने परतणाऱ्या या स्पर्धेला यंदा विशेष महत्त्व आहे, कारण पहिल्यांदाच लीगने खेळाडूंच्या लिलावाची प्रक्रिया पार पाडली. सहा संघांच्या सहभागाने 4 जानेवारीपर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे.
खेळाडूंच्या लिलावानंतर संघांमध्ये मोठे बदल
या वर्षी झालेल्या पहिल्या खेळाडू लिलावामुळे अनेक संघांची रचना बदलली आहे. T20 विश्वचषक 2026 फेब्रुवारीत होणार असल्याने अनेक आंतरराष्ट्रीय तारे ILT20 ला सरावाची आणि तयारीची उत्तम संधी म्हणून पाहत आहेत. मुख्य म्हणजे, या लीगची इतर कोणत्याही मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेशी टक्कर नसल्याने सर्व संघांनी मजबुत संघरचना उभी केली आहे. किरोन पोलार्ड आणि निकोलस पूरन पुन्हा एकदा MI एमिराट्सकडून खेळताना दिसतील. शारजाह वॉरियर्सचे नेतृत्व टिम साउदीकडे असेल, तर लॉकी फर्ग्युसन डेझर्ट वायपर्सचे नेतृत्व सांभाळेल. दुबई कॅपिटल्समध्ये दासुन शनाका, गुलबदिन नायब आणि रोवमन पॉवेल यांच्यावर विशेष जबाबदारी असेल. गल्फ जायंट्सचे नेतृत्व यंदाही जेम्स विन्स करत आहेत.
IPL लिलावापूर्वी खेळाडूंसाठी मोठी संधी
आगामी IPL लिलाव लक्षात घेता, अनेक खेळाडूंसाठी ILT20 मधील कामगिरी निर्णायक ठरणार आहे. नवीन-उल-हक, जॉनी बेअरस्टो, टॉम बँटन, रहमानुल्ला गुरबाज, लियाम लिव्हिंगस्टोन आणि जेसन होल्डर यांच्याकडे यावेळी फ्रँचायझींचे विशेष लक्ष असेल.
भारतीय खेळाडूंचा सहभाग
दिनेश कार्तिक आणि पियुष चावला हे दोन अनुभवी भारतीय क्रिकेटर या हंगामात उतरले आहेत. तसेच भारताचा माजी अंडर-19 विश्वविजेता कर्णधार उन्मुक्त चंद अबू धाबी नाईट रायडर्सकडून मैदानात उतरेल. हंगामाचा पहिला सामना आज गतविजेता दुबई कॅपिटल्स विरुद्ध डेझर्ट वायपर्स यांच्यात होणार आहे. हा सामना गेल्या वर्षीच्या अंतिम सामन्याची पुनरावृत्ती असल्याने विशेष उत्सुकता आहे. उद्घाटन समारंभात प्रसिद्ध गायक अली जफर रंगारंग सादरीकरण करणार आहेत.
? Season 4 Schedule Announcement ? DP World ILT20 returns for its 4th edition, promising drama, action, excitement & emotion. ?️ Mark your calendars and get ready to root for your favourite side, as the official fixtures for the Season 4 have just dropped! Read the full… pic.twitter.com/JbA7bjrqov — International League T20 (@ILT20Official) September 3, 2025
हेही वाचा – Hardik Pandya: हार्दिक पंड्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! BCCI ने दिली ‘ही’ खास परवानगी
भारतामध्ये ILT20 सामने कुठे पाहणार?
भारतातील क्रिकेट चाहत्यांसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. भारतात, ILT20 Z नेटवर्कच्या टीव्ही चॅनेल &Pictures SD, Zee Cinema HD, Zee Action, Zee Thirai SD आणि Zee Cinemalu वर थेट उपलब्ध असेल. चाहते OTT प्लॅटफॉर्म Zee 5 वर स्पर्धेचा आनंद घेऊ शकतील. शिवाय, ILT20 सामने फॅनकोड अॅप आणि वेबसाइटवर देखील थेट प्रक्षेपित केले जातील. क्रिकेट चाहत्यांना त्यामुळे टीव्हीपासून मोबाइलपर्यंत, कुठेही सहज ILT20 चा थरार अनुभवता येणार आहे.